लातूर : लातुरात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत चार बळी गेले आहेत. यातील तीन मृतांचा अहवाल ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’ने ‘स्वाईन फ्लू’ पॉजिटीव्ह असा पाठविला आहे. मंगळवारी एका चौदा वर्षीय मुलीच्या मृत्यूने तर वैद्यकीय वर्तुळाला चांगलाच हादरा बसला आहे. या आजाराला नागरिकांनी आता संसर्ग होऊ नये याची दक्षता घेऊन सामूहिक पध्दतीने मुकाबला करण्याची गरज आहे. सामुहिक पद्धतीने मुकाबला केल्यास हा संसर्गजन्य आजार आटोक्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बसवराज कोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे, कारणे, घ्यावयाची काळजी, स्वाईन फ्लू काय आहे, स्वाईन फ्लू कोठून आला, नागरिकांनी काय करू नये, काय करावे, या संबंधीची माहिती श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार असून तो विषाणूमुळे होणार आजार आहे. याला मराठीतून डुक्कर ताप असे म्हणता येईल. डुकराच्या श्वसननलिकेतील हा आजार संसर्गाने मानवी शरिरात येऊन बसल्याने याला ‘स्वाईन फ्लू’ हे नाव पडले. ‘एन्फ्लूएंजा व्हायरस ए एच १ एन १’ टाईप या विषाणूमुळे आजार होता. या आजारामुळे मुख्यत: डुकरांची श्वसनसंस्था बाधित होते व त्यांच्यापासून हा मनुष्यामध्ये संक्रमित होतो. हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हवा, लाळ व इतर द्रवपदार्थांवाटे पसरतो. बाधित व्यक्तीच्या लक्षणापूर्वी २४ तास अगोदर व नंतर सात दिवस हा विषाणू संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरतो. ‘स्वाईन फ्लू’ चा विषाणू हा एन्फ्लएंझा व्हायरस ए प्रकारात मोडत असून त्याचे चार उपप्रकार पडतात. एच १ एन १, एच १ एन २, एच ३ एन २ आणि एच ७ एन ९ असे चार प्रकार सांगितले आहेत. हा विषाणू नेहमी संक्रमण करीत राहतो. हा शरिरात प्रवेश केल्यानंतर मुख्यत: श्वसननलिकेवर परिणाम करतो व रोगप्रतिकार शक्ती कमी करतो. त्यामुळे रुग्णाला श्वसनदाह होतो (दम लागतो.) नंतर थंडी वाजून ताप येतो. ‘स्वाईन फ्लू’ झालेल्या व्यक्तीला ताप येतो, तो लवकर उतरत नाही. कधी कधी थंडीवाजून ताप येतो. रुग्णाचा घसा दुखतोे,खवखवतो. त्याला खोकला येतो. सर्दीने नाक गळायला लागते, अंग दुखते, डोके दुखी, उलट्या होतात, मळमळ होते, जुलाब होतो, दम लागतो. उच्च दाब, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, दमा, श्वसनाचे आजार मुत्रपिंडाचे आजार इत्यादी रुग्णांमध्ये असे आजार असलेल्या रुग्णांना हा आजार जास्त घातक ठरु शकतो. बाधित डुकरांच्या संपर्कात आल्यानंतर व बाधित डुकरांचे विनाप्रक्रिया मांससेवन केल्यानंतर स्वाईन फ्लू पहिल्यांदा मानवी शरिरात हस्तांतरीत झाला. यानंतर बाधित मानवाच्या संपर्कात निरोगी माणूस आल्याने हा आजार माणसात पसरु लागला. आता हा आजार माणसात बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होणाऱ्या संसर्गातून पसरत असल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवा़४खोकताना व शिंकताना हातरूमाल वा कपड्याने नाक झाकून घ्या़४आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात साबणाने धुऊन घ्या़४स्वच्छ रूमाल वापरा व रूमाल रोजच्या रोज बदला़४खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची ईन्फ्लूएंझाची लक्षणे आढळून येणाऱ्या बाधित व्यक्तीपासून दूर अंतरावर रहा़४तणावापासून स्वत:ला सांभाळा, शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम रहा व योग्य प्रमाणात झोप घ्या़४भरपूर पाणी प्या व पोषक अन्नाचे सेवन करा़ ४धुम्रपान टाळा़४लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा़
लातुरात ‘स्वाईन फ्लू’ चे चार बळी..दक्षता घ्या..
By admin | Updated: February 12, 2015 00:57 IST