शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांत आरोग्य तपासणी शिबिरे बंद

By admin | Updated: September 7, 2014 00:30 IST

अभिमन्यू कांबळ, परभणी मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये एकही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले नसून

अभिमन्यू कांबळ, परभणीमानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये एकही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले नसून, एका तालुक्यामध्ये केवळ एक शिबीर घेण्यात आले असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे यासंदर्भात झालेले दुर्लक्ष समोर आले आहे़ जिल्ह्यातील नऊही तालुक्यांची मानव विकास मिशन मोहीम राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़ २००१ च्या जनगणनेनुसार व तालुक्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण आणि २००२ च्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांचे प्रमाण हे निकष घेऊन या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे़ याअंतर्गत मानव निर्देशांक वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत़ परंतु, या योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र ढेपाळल्याने शासनाचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र समोर आले आहे़ मानव विकास मिशनअंतर्गत तज्ञ डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकांची व मातांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करणे हे उपक्रमही राबविण्यात येतात़प्रत्येक आरोग्य केंद्रांतर्गत एका महिन्यात किमान दोन आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आवश्यक करण्यात आले आहे़ परंतु, परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांचे काम मात्र याअंतर्गत असमाधानकारक असल्याचे दिसून आले आहे़ जिल्ह्यातील परभणी, सेलू, सोनपेठ व पाथरी या चार तालुक्यांत एप्रिल ते जुलै महिन्यांत एकही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलेले नाही़ तर मानवत तालुक्यात केवळ एक शिबीर घेण्यात आले़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २० शिबिरे घेण्यात आली तर पूर्णा तालुक्यामध्ये १३ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये १२ शिबिरे घेण्यात आली आहे़ पालम तालुक्यात ६ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत़