शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव दरोड्यात चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:39 IST

नांदेड: नायगाव तालुक्यातील राहेर येथे १० जुलै रोजीच्या रात्री प्रल्हाद आनंदराव इंगळे यांच्या घरी चौघांनी दरोडा टाकला होता़ यावेळी कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाणही केली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नायगाव तालुक्यातील राहेर येथे १० जुलै रोजीच्या रात्री प्रल्हाद आनंदराव इंगळे यांच्या घरी चौघांनी दरोडा टाकला होता़ यावेळी कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाणही केली होती़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने चार दरोडेखोरांना पकडले़ त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे़ प्रल्हाद इंगळे हे घरात झोपलेले असताना, रात्री एक वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला़ इंगळे यांच्या गळ्याला चाकू लावला़ तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली़ त्यानंतर कपाटातील रोख रक्कम, सोने-चांदी असा मिळून ७ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात कुंटूर ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे तपास देण्यात आला होता़खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली अन् साथीदारांची नावेही सांगितली़ पोलिसांनी या प्रकरणात चार दरोडेखोरांना अटक केली आहे़ त्यामध्ये आनंदा देवराव भोसले (रा़चिखली ताक़ंधार), इंदल माधवराव शिंदे (रा़लालवंडी ता़ नायगाव), विकास विश्वनाथ जोगदंड (रा़बीड) व कविताबाई आनंदा भोसले यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोने-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत़ सोमवारी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संदीप गुरमे यांनी पथक तयार केले होते़ त्यात पोउपनि दिनेश काशीद, विनायक शेळके, माणिक हंबर्डे, गुंडेराव करले, रवी बाबर, गजानन बयनवाड, योगेश शहाणे, विवेक पाटील, संतोष कुमरे, प्रकाश तमलूरे, बालाजी राठोड, विजय आऊलवार, भगवान कोत्तापल्ले यांचा समावेश होता़