शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अंबाजोगाईच्या मातीत शेतकरी संघटनेची पायाभरणी

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईस्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव येथील रमेश मुगे हे संघटनेच्या आंदोलनातील पहिले हुतात्मा ठरले. त्यानंतर अंबाजोगाईतील शिबिरात मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले व या विचारमंथनातून शेतकरी संघटना विचार व कार्यपद्धती या ऐतिहासिक ग्रंथाची निर्मिती झाली. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या निधनाने आठवणींना उजाळा मिळाला.अंबाजोगाईत २२ सप्टेंबर १९८६ रोजी अखिल भारतीय ज्वारी परिषद तर २३ सप्टेंबर १९८६ रोजी शेतकरी विद्यार्थी संघटनेची निर्मिती झाली. अमर हबीब, श्रीरंग मोरे, यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय ज्वारी परिषद झाली होती. खोलेश्वर महाविद्यालयात शरद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य रा. गो. धाट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी मेळावा झाला. शरद जोशी यांनी कालिदास आपेट व अ‍ॅड. सच्चिदानंद मोरे यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविली होती. १९९६ साली ऊसावरील झोनबंदीचा कायदा संपविण्यासाठीचा हातोडा मोर्चा अंबासाखर कारखाना येथे झाला. या सर्व घटनांनी अंबाजोगाई हे शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी करणारे प्रमुख केंद्र ठरले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातील पानगाव येथे ऊसआंदोलन झाले. या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रमेश मुगे हा शेतकरी हुतात्मा ठरला.श्रीरंगराव मोरे यांचे सहकारी दत्तू आपेट गुरुजी, अ‍ॅड. शिवाजीराव कराड, अ‍ॅड. कुंडलिक कराड, वसंतराव मोरे, अमर हबीब, नारायण पांडे, माजी सैनिक भगवानराव शिंदे, पंढरीनाथ यादव, केशव बडे, रामराव नाटकर, किसनराव बावणे, प्रा. केशव देशपांडे, प्रा. ए. बी. देशपांडे ही मंडळी पहिल्या फळीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी संघटनेचे सच्चे पाईक बनले तर शरद जोशींच्या सततच्या संपर्कामुळे अंबाजोगाई तालुक्यात अंकुशराव काळदाते, संभाजी रेड्डी, शिवाजीराव देशमुख, अनुरथ मामडगे, अशोक गुणाले, वसंत शिंदे, उत्तमराव तट, परमेश्वर पिसुरे, कालिदास आपेट, राजाभाऊ गौरशेटे, अच्युत गंगणे, असे अनेक कार्यकर्ते शेतकरी संघटनेत मोठ्या हिरीरीने सहभागी झाले. परिणामी अंबाजोगाईला लाभलेला संघर्ष व चळवळीचा ऐतिहासिक वारसा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा अखंडित सुरू राहिला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी गिरवली, धानोरा, जवळगाव, वाला, चनई, मोरेवाडी, बोरीसावरगाव आदी गावे पिंजून काढली.शरद जोशी हे राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी पहिला खासदार निधी पानगावला दिला. ५० लक्ष रुपयांपैकी २५ लक्ष रुपयांतून आंदोलनात हुतात्मा ठरलेल्या रमेश मुगे यांच्या नावाने ग्रंथालय व स्मारक उभारले.पहिला ‘ज्ञानश्री पुरस्कार’ शरद जोशी यांना ४शेतकरी संघटनेचे नेते श्रीरंग मोरे यांनी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्यांना ज्ञानश्री पुरस्कार प्रतिवर्षी देण्याचे जाहीर केले. पहिल्या पुरस्काराचे मानकरी शरद जोशी ठरले. सन १९१२ मध्ये रोख १ लक्ष रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन त्यांना अंबाजोगाईत सन्मानित करण्यात आले होते.