शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस शेतकऱ्यांचे पैसे लटकले !

By admin | Updated: August 27, 2014 01:37 IST

पाथरूड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींची कामे करण्यात आली आहेत. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) डिजीटल स्वाक्षरीअभावी

पाथरूड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींची कामे करण्यात आली आहेत. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) डिजीटल स्वाक्षरीअभावी ४० शेतकऱ्यांच्या विहिरींचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. बिले सादर करून जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे, हे विशेष.सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाअंतर्गत सिंचन विहिरी घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार तुळजापूर, भूम आणि परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी घेतल्या. सुरूवातीच्या काळात पैसेही वेळेवर मिळत गेले. परंतु, मध्यंतरीच्या काळामध्ये परंड्यासह कळंब तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे कामाचे पेमेंट काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी बंधनकारक करण्यात आली. तत्कालीन गटविकास अधिकारी मुल्ला यांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी सहायक गटविकास अधिकारी म्हणून टी. बी. उगलमुगले यांची नियुक्ती झाली आहे. बीडीओचे पद रिक्त असल्याने याही पदाचा पदभार त्यांच्याकडेच आला आहे. दरम्यान, सदरील पद रिक्त असल्याने डिजीटल स्वाक्षरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. डिजीटल स्वाक्षरी नसल्यामुळे तालुक्यातील चाळीसवर शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे पैसे लटकले आहेत. वारंवार हेलपाटे मारूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना जवळपास आठ लाख रूपये येणे बाकी आहे. याबाबतीत प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.डिजीटल स्वाक्षरी अभावी भूम पंचायत समितीतून रोहयोची बिले देता येत नव्हती. याबाबत ओरड होऊ लागल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने ही बिले परंडा गटविकास अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने काढण्यात आली आहेत. ४डिजीटल स्वाक्षरी नमुना मान्यतेसाठी नागपूर येथील नरेगा कार्यालयामध्ये पाठविण्यात आली आहे. ४येत्या चार ते पाच दिवसात स्वाक्षरी नमुन्यास मान्यता मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची बिले तातडीने दिली जातील, असे प्रभारी गटविकास अधिकारी टी. बी. उगलमुगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामावरील मजुरांचे पैसे देण्याला प्राधान्य दिले. जून २०१४ पासून ते आजतागायत ४० ते ४५ लाख रूपये वितरित करण्यात आले आहेत. यासाठी परंडा बीडीओंच्या डिजीटल स्वाक्षरीचा आधार घ्यावा लागला. संबंधित शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसेही सही नमुन्याला मान्यता मिळताच देण्यात येतील. यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल, असे उगलमुगले यांनी सांगितले.