शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही औपचारिकता

By admin | Updated: June 26, 2016 00:40 IST

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे काम गुरुवारपासून

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे काम गुरुवारपासून मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुरू आहे. शुक्रवारीही १४७ नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली.मागील वर्षी शासनाने मनपाकडे शहर विकास आराखडा सुपूर्द केला. मनपा सर्वसाधारण सभेने या आराखड्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या केल्या. त्यानंतर नागरिकांसाठी आराखडा प्रसिद्ध केला. अनेक नागरिकांवर अन्याय करणारा हा आराखडा ठरला. आराखडा अत्यंत चुकीचा असल्याचे सांगून काही नागरिकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना मनपाने गुरुवारपासून आक्षेपांवर सुनावणी घेण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मौलाना आझाद संशोधन केंद्रात अलोट गर्दी केली होती. माजी उपमहापौर संजय जोशी, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी संपूर्ण आराखड्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मिटमिटा येथील गट नंबर ९४ मधील नागरिकांच्या अनेक घरांवर शैक्षणिक आरक्षण टाकण्यात आले आहे. तब्बल ४२ जणांनी समितीवर प्रश्नांचा भडिमार केला. पडेगाव येथील गौतम पवार हौसिंग सोसायटीवर मनपाच्या वतीने डीपी रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. हा रस्ता केवळ कत्तलखान्यापर्यंत असून, त्याचा कोणताही फायदा नागरिकांना होणार नसून, हे चुकीचे आरक्षण टाकण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. शासकीय सदस्य म्हणून नगररचना विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक अ. रा. पाथरकर, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक प्र. ते. महाजन, वास्तुविशारद अश्विनी अमोल गंभीर, पर्यावरण तज्ज्ञ दिलीप यार्दी, तीन अशासकीय सदस्यांमध्ये नगरसेवक राज वानखेडे, गजानन मनगटे आणि अजीम खान, वसंत निकम यांची उपस्थिती होती.