शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

वन विभागाने अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 01:40 IST

तालुक्यातील गोमणी बिटाअंतर्गत येत असलेल्या हरिनगर येथील सर्वे क्र. १०३ मधील ७ हेक्टर

हरीनगर येथील कारवाई : दोन सबमर्सिबल मशीन व पाईप जप्त लोकमत न्यूज नेटवर्क मुलचेरा : तालुक्यातील गोमणी बिटाअंतर्गत येत असलेल्या हरिनगर येथील सर्वे क्र. १०३ मधील ७ हेक्टर जागेवर अतिक्रमण करून शेती केली जात असल्याची माहिती वन विभागाला माहीत झाल्यानंतर वन विभागाने मोकाचौकशी करून अतिक्रमण हटविले आहे. हरिनगर येथील लक्ष्मीकांत नकूल मंडल याने ७ हेक्टर जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर बोअरचे खोदकाम केले होते. अतिक्रमीत जागा असताना वीज विभागाने विद्युत पुरवठा केला होता. लक्ष्मीकांत मंडल हा मागील दहा वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करीत होता. याबाबतची तक्रार गावातील काही नागरिकांनी वन विभागाकडे केल्यानंतर वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोकाचौकशी करून मापन केले असता, मंडल याने अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. सदर कारवाई आलापल्ली वन विभागाचे प्रकाष्ठ निस्कान अधिकारी पचारे यांच्या मार्गदर्शनात पेडिगुंडमचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. व्ही. मेडेवार, क्षेत्रसहायक सिडाम, क्षेत्रसहाय लटारे, मिसरी, नरूले यांच्या पथकाने केले. अतिक्रमण हटविण्याकरिता मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पाठक, पोलीस उपनिरीक्षक भगत व त्यांच्या चमूने पूर्णवेळ राहून सहकार्य केले. जागेवरून दोन सबमर्शिबल मशीन व पाईप जप्त करण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या जागेवर कुणी अतिक्रमण करीत असल्यास याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला द्यावी, सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पेडिगुंडम वन परिक्षेत्राअंतर्गत यापूर्वीही अतिक्रमण हटविण्याच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध अतिक्रमण हटविले जात असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही काही जणांनी अजूनही अतिक्रमण करून जागा बळकावली आहे.