शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिंतुरात अन्नसुरक्षा योजना दलालांच्या घशात

By admin | Updated: February 24, 2016 23:57 IST

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़ त्यामुळे ही योजना जिंतूर तालुक्यात तरी दलालांनीच घशात घातली असून, अन्नदाता शेतकरी मात्र अन्नधान्यापासून वंचित राहिला आहे़ जिंतूर तालुक्यात ६० हजार ७१९ शेतकऱ्यांना दरमहा २ हजार क्विंटल गहू व तांदळाचे वाटप होते़ परंतु, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहचत नाही़ तालुक्यातील १७० गावांमध्ये २०६ दुकानांद्वारे अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचे वाटप केले जाते़ जिंतूर शहरात १ हजार १३३ कार्डधारक असून, ५ हजार ३५२ शेतकरी योजनेचा लाभ घेतात़ उर्वरित तालुक्यात ११ हजार ३४० कार्डधारक असून, ५५ हजार ३३७ शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत़ योजनेद्वारे ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वाटप केला जातो़ दरमहा साधारणत: १८०० क्विंटल गहू व १२०० क्विंटल तांदळाचे वाटप होत़े़ मात्र या योजनेचे फलित काय? हे गुलदस्त्यात आहे़ कारण तालुक्यातील अनेक शेतकरी लाभार्थी अजूनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत़ ज्या लाभार्थ्यांची नावे यादीत आहेत़ त्यांच्यापर्यंत धान्य पोहचत नाही़ परिणामी ही योजना स्वस्तधान्य दुकानदार व दलालांच्या फायद्याची ठरत आहे़ (वार्ताहर) (क्रमश:)