शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्र देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यालय असलेली इमारत म्हणजे औषधी भवन या वास्तूच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त ...

औरंगाबाद : जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यालय असलेली इमारत म्हणजे औषधी भवन या वास्तूच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५७ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन आ. सतीश चव्हाण यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त संजय काळे , सहायक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर, औषध निरीक्षक राजगोपाल बजाज, जीवन जाधव, वर्षा महाजन यांना ‘कोरोना योद्धा’ हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांनी औषधी भवन या इमारतीच्या बांधकामाच्यावेळी घडलेल्या अनेक प्रसंगांची माहिती दिली.

संजय काळे यांच्याहस्ते औषध विक्रेते, वितरक आणि टास्क फोर्समधील केमिस्ट यांचा ‘कोरोना योद्धा’ हे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मराठवाडा संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडे, महाराष्ट्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष विजय नांदापूरकर यांची उपस्थिती होती.

संघटनेचे माजी सचिव दिलीप ठोळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संघटनेचे सचिव विनोद लोहाडे यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर कोरे आणि निखिल सारडा यांनी केले. संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र रावत यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद लोहाडे, निखिल सारडा, सागर पाटील, नितीन देशमुख, सुनील देशमुख, बाबूराव सोनवणे, किरण जोशी, पवनचंद सिंगी, रईस शेख यांनी प्रयत्न केले.

फोटो ओळ...

औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून करताना आ. सतीश चव्हाण. यावेळी उपस्थित अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी, असोसिएशनचे पदाधिकारी.