शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

देविसिंग राजपूत , येणेगूर पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते.

देविसिंग राजपूत , येणेगूरपर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहर येतो. मात्र यावेळी कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपद महिन्यात फुलांचा बहार आला आहे. येणेगूर परिसरातील शेतकरी निसर्गातील या बदलामुळे अचंबित झाले आहेत. आयुर्वेदात कडूलिंबाच्या वृक्षाला अणन्य साधारण महत्व आहे. या वृक्षाची, साल, फुले, पाने, फळे (लिंबोळ्या) पानाच्या काड्या यापासून अनेक उपपदार्थ बनविले जाते. त्यामध्ये लिंबोळी अर्क, लिंबोळी पेंड, कडूनिंब तेल, लिंबोळी खत, भूनंबादी काढा आदी आयुर्वेदिक उपचारासाठी तयार केले जाते. त्वचा रोग, कृमिनाशक, पिकावर फवारणीसाठी आदी अनेक कारणासाठी या वृक्षाचा उपयोग केला जातो. मानवी जीवनाला निंब वृक्षाचे मोठे फायदे आहेत. हा कल्पवृक्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदु समाजात चैत्रशुद्ध प्रतिपदेला (गुडी पाडवा) निंबफुले, हरभरा डाळ व गुळ यापासून पातळ पदार्थ बनवून घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायक म्हणून पाजले जाते. ते अनादी कालापासून त्याचे अनुकरण प्रतिवर्षी केले जाते. म्हणूनच या वृक्षास कामधेनू असेही म्हटले जाते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहार येतो असा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. मात्र यंदा येणेगूर परिसरातील आष्टामोड, सुपतगाव, येणेगूर, नळवाडी शिवारातील काही झाडांना नवीन पालवी फुटून फुलांच्या तोरांची गुच्छे बहरल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. देवरकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा जणूकी बदल नसून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे ऋतुचक्र (उन्हाळा, हिवाळा, पावसाळा) सारखे पुढे जात असल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. सतत तीन ते चार वर्ष एखाद्या वृक्षाला वर्षातून दोनदा बहर येत असेल तो जनूकीय बदल असे म्हणता आले असते. मात्र लिंब वृक्ष निलेसी परिसरातील असून, अगादी रिक्टीका इंदिका असे वनस्पती शास्त्रीतील त्याचे नाव आहे. या परिवारातील वृक्षांना वर्षातून एकदाच फुले व फळे येतात असेही डॉ. देवरकर यांनी सांगितले.