शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी पथकाकडून शौचालय बांधकामाबाबत झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:53 IST

सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने गुरुवारी स्वच्छ भारत मिशन कक्षाची झाडाझडती घेतली. यावेळी या पथकाला महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी वितरित करीत असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे जिल्हा परिषदेकडून पालन झाले की नाही, या संदर्भात चौकशी करण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने गुरुवारी स्वच्छ भारत मिशन कक्षाची झाडाझडती घेतली. यावेळी या पथकाला महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट निधी वितरित करण्याऐवजी खाजगी दुकानदारांना हा निधी देऊन त्यांच्याकडील साहित्य लाभार्थ्यांना दिल्याचे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या संदर्भात विधानपरिषदेत आ.बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मनोज चौधर यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांचे पथक गुरुवारी चौकशीसाठी परभणीत दाखल झाले. या पथकाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत निधी वितरित करीत असताना मार्गदर्शक तत्वे पाळण्यात आली की नाही, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर वितरित करण्यात आलेल्या निधीच्या जमाखर्चाचा ताळमेळ, मंजुरी आदेश, खर्च प्रमाणके, निविदा करारनामे, कार्यारंभ आदेश व प्रदान करण्यात आलेल्या देयकांचा बँक खात्याचा तपशील याबाबतची चौकशी केली. याशिवाय निधी वितरित करण्यात आलेल्या गावांमधील ग्रामपंचायतींनी तशी मागणी जि.प.कडे नोंदविली होती का? ज्या लाभार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले, त्यांची पोहोच घेतली का? साहित्य खरेदी करण्यात आलेल्या विशिष्ट दुकानांची निवड कशाच्या आधारे करण्यात आली? आदी बाबतची माहिती या पथकाने नोंदविली.अनेक फाईलींची तपासणी केल्यानंतर पथकाच्या हाताला महत्त्वपूर्ण माहिती लागली असल्याचे समजते.