शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी आता सकाळी ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:06 IST

औरंगाबाद : इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ८ जानेवारीपासून दुपारऐवजी आता सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे मुंबईला लवकर जाऊ इच्छिणाऱ्या ...

औरंगाबाद : इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ८ जानेवारीपासून दुपारऐवजी आता सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे मुंबईला लवकर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.

इंडिगोने काही दिवसांपूर्वीच प्रवाशांची मागणी पाहून मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस आहे. मात्र, ८ जानेवारीपासून हे विमान दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईसाठी शहरातून रोज हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहणार आहे. हे विमान सध्या मुंबईहून येऊन औरंगाबादहून दुपारी १२.१० वा. मुंबईला रवाना होते. मुंबईत पोहोचेपर्यंत एक वाजून जातो. त्यामुळे अर्धा दिवस औरंगाबादेत आणि अर्धा दिवस मुंबईत अशी प्रवाशांची अवस्था होत होती. त्यातून नियोजित कामे करण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानाचे उड्डाण झाले पाहिजे, अशी मागणी होत होती. त्यासाठी इंडिगोकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता औरंगाबादहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेईल, अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली.

आठवड्यातून ३ दिवसांसाठी एअर इंडियाचीही मुंबईसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.