शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांना लुटून पसार पाच दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:11 IST

खुलताबादला जाणाºया दुचाकीस्वार तरुणांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल आणि पाकीट हिसकावून कारने पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना सतर्क पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खुलताबादला जाणाºया दुचाकीस्वार तरुणांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल आणि पाकीट हिसकावून कारने पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना सतर्क पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. ही घटना दौलताबाद घाटात बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.अरबाज खान अजहर खान (२१, रा. कबाडीपुरा), नवीद सिद्दीकी अजीम सिद्दीकी (२०, रा. जुना बारुदगरनाला), सय्यद सरफोद्दीन (२१, रा. जुनाबाजार),सोहेल खान फेरोज खान (२२, रा. गांधीनगर) आणि शेख शाहरुख शेख हनीफ (२४, रा. मुर्गीनाला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले की, खुलताबादचे रहिवासी रवींद्र सुरेंद्र फुलारे (२५) हे शेंद्रा एमआयडीसीमधील कंपनीत नोकरी करतात. बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ते महावीर चौकात कंपनीच्या गाडीतून उतरले. त्यांचा मित्र विशाल देवीदास सोमवंशी (२६) सोबत होता. दोघे मोटारसायकलने औरंगाबादकडून खुलताबादकडे निघाले. रात्री दीड वाजेच्या सुमारास दौलताबाद घाटातील वळणावर रस्त्याच्या कडेला पांढºया रंगाची बोनेट उघडी असलेली कार (क्रमांक एमएच-२० एच-९९७) उभी दिसली. कारजवळ उभे असलेले चार ते पाच जण अचानक रस्त्यावर आल्याचे पाहून रवींद्र यांनी घाबरून गाडीचा वेग कमी करून ती पुन्हा मागे वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु उभ्या असलेल्यांपैकी दोघांनी पाठलाग करून मागे बसलेल्या विशालला कॉलर पकडून खाली पाडले. त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. गाडी थांबवून रवींद्र त्याच्या मदतीला धावला. आरोपींनी त्यालाही मारहाण करीत मोबाइल आणि पाकीट हिसकावले. पाकिटात हजार रुपये होते. खुलताबादकडून अन्य दुचाकीचालक आल्याचे पाहून आरोपींनी त्यांना सोडले आणि ते कारमध्ये बसून औरंगाबादच्या दिशेने निघाले. तेथून जाणाºया अन्य वाहनांच्या प्रकाशात कारचा क्रमांक दोघांनी पाहिला. काही वेळातच तेथून दौलताबाद ठाण्याच्या पोलिसांचे गस्ती वाहन जात होते. त्यांना थांबवून झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वायरलेसमार्फत पोलीस नियंत्रण कक्षाला दरोडेखोरांच्या गाडीची माहिती दिली.