शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील २११ लघु, मध्यम प्रकल्पात पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, शेतीमशागीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यातील २११ लघु, मध्यम प्रकल्पात पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, शेतीमशागीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे़ तर ग्रामीण भागातील टंचाईसदृश्य गावांसाठी ६५ टँकर सुरू असून, १९५ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़सलग तीन वर्षे दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागलेल्या जिल्हावासियांना गतवर्षी गणोशोत्सव कालावधीत झालेल्या पावसाने काही अंशी दिलासा दिला़ कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही़ तर उजनी पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने उस्मानाबादकरांनाही यंदा टंचाई जाणवली नाही़ उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या रबीचे मोठे नुकसान झाले़ वादळी वाऱ्यासह बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळेही शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही मोठा फटका सहन करावा लागला़ मान्सून वेळेत दाखल होईल, असा हवामान खात्याने प्रारंभी अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली होती़ मात्र, नंतर केरळातच अडखळत अडखळत मान्सून दाखल झाला आहे़ वातावरणातील बदलानंतर मान्सून जिल्ह्यात कधी येईल याचा अंदाज नाही़ मशागतीची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागले आहे़ ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ६५ टँकर सुरू करण्यात आले असून, १९५ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर मेडसिंगासह इतर गावात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल उन्मळून पडल्याने पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे येथील विद्युत पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी होत आहे़सद्यस्थिीत जिल्ह्यातील १९३ लघू प्रकल्पात ४४़०९५ दलघमी पाणीसाठा असून, यात २०़५८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५़८० आहे़ मध्यम १७ प्रकल्पात ७५़२९१ दलघमी पाणी असून, यातील ३१़४४५ दलघमी म्हणजे ४़९६ टक्के पाणीसाठा उपयुक्त आहे़ एकूण २११ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४़९६ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत ही जवळपास चार टक्क्यांनी अधीक आहे़ (प्रतिनिधी)काही प्रकल्पातील स्थितीउस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा प्रकल्पात ७़१ टक्के, रूईभर प्रकल्पात १३़६ टक्के, तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात ११़४६ टक्के, हरणी प्रकल्पात ७़८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ तर कळंब तालुक्यातील रायगव्हाण, उमरगा तालुक्यातील तुरोरी, भूममधील संगमेश्वर, तर परंडा तालुक्यातील खासापुरी, चांणी, खंडेश्वर, साकत या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नसून, जोत्याखाली पाणीपातळी आहे़गतवर्षी जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि उस्मानाबाद या तालुक्यामध्ये पावसाने सरासरी गाठली. मात्र भूम, परंडा, वाशी आणि कळंब या चार तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यामध्ये असणारे प्रमुख प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. तसेच विहीर, बोअर यासारख्या जलस्त्रोतांची पाणी पातळीही फारशी न उंचावल्यामुळे जलस्त्रोत कोरडे पडण्यास सुरुवात झाली. परिणामी अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या विविध गावांत ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.