शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

गावठी पिस्तुलासह पाच आरोपी अटकेत

By admin | Updated: December 12, 2014 00:52 IST

जालना : अहमदनगर जिल्ह्यातून गावठी पिस्तुल विक्रीसाठी जालन्यात घेऊन आलेल्या इसमासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक करून सदरपिस्तुल जप्त केला आहे.

जालना : अहमदनगर जिल्ह्यातून गावठी पिस्तुल विक्रीसाठी जालन्यात घेऊन आलेल्या इसमासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक करून सदरपिस्तुल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, बदनापूर येथील हॉटेल एकांतचे पाठिमागील बाजूस नेवासा जि. अहमदनगर येथील दोन इसम हे गावठी बनावट पिस्टल घेऊन जालना येथील नसीर शेख रा. माळीपुरा यांना विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पो. नि. कुलकर्णी व सपोनि विनोद इज्जपवार यांनी त्यांचे स्टाफसह बातमीच्या ठिकाणी सापळा रचून बसले. सायंकाळी ६.१० वाजता सदरील ठिकाणी दोन इसम एका विना नंबरच्या मोटारसायकलवर त्या ठिकाणी येऊन थांबले.थोड्या वेळातच त्यांचेजवळ एक इसम येऊन ते एका ठिकाणी बसून काही तरी व्यवहार करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना घेराव घालून जागीच ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एक गावठी बनावट पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, मोबाईल व एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि विनोद इज्जपवार, विशेष कृती दल जालना हे करत आहेत. आरोपींची नावे अशी : शेख अलीम शेख साहेब मियाँ (वय २०, रा. नॅशनल नगर, जालना), अमजद हनीफ पटेल (वय २१, रा. अहिल्यानगर, नेवासा), इम्रान इलियास शेख (वय २१, रा. नाईकपुरा, नेवासा).सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सपोनि विनोद इज्जपवार, विशेष कृती दलाचे अर्जुन पवार, स्कॉट, हजारे, धनाजी कावळे, अंबादास साबळे, साईनाथ पवार, गजू भोसले, शिवलकर, चिंचोले, देठे व जाफराबाद पोलिस ठाण्याचे पोकॉ दीपक पाटील, घनसावंगी ठाण्याचे पोकॉ सचिन चौधरी यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)