औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास उपचारासाठी सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात दाखल केले होते. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर तंदुरुस्त झालेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने सोमवारी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात घेतले. तो प्राणिसंग्रहालयातच राहावा अशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची इच्छा होती; परंतु त्याच्यासाठी निसर्गात वास्तव्य महत्त्वाचे आहे.
तंदुरुस्त बिबट्या पुन्हा वनात
By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST