शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी ‘मत्स्य’चा हातभार

By admin | Updated: November 25, 2015 23:24 IST

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे.

बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे. आत्महत्या रोखण्याासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने समाधान व्यक्त होत आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बीडचा आकडाही पावने तिनशेच्याजवळ जावून पोहचला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून मत्स्य व्यवसायासंदर्भात योजनांची अंमलबजावणी करता यावी, यासाठी ८ एप्रिल २०१५ ला मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर १२ जुलै रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली आणि ३० जुलै २०१५ ला योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा बीडमध्ये लाभ घेण्यास सुरूवात झाली असून, मत्स्यबीजासाठी १४ अर्ज आले असून ९ अर्ज फिरते वाहन देण्यात यावे, यासाठी आले आहेत.१०० टक्के अनुदानकृषी विभागाने बांधुन दिलेल्या शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम १०० टक्के अनुदान तत्वावर राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमुदही करण्यात आलेले आहे. तसेच एका तलावात एक हजार मत्स्य बोटुकली आणि एक हजार कोळंबी बीज संचयन करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)