शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटीचे दर्शन

By admin | Updated: June 26, 2016 00:39 IST

घाटनांद्रा : पेंडगावच्या (ता. सिल्लोड) गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटीचे दर्शन झाल्याने पेडगाववासीयांनी आनंद व्यक्त केला .

घाटनांद्रा : पेंडगावच्या (ता. सिल्लोड) गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटीचे दर्शन झाल्याने पेडगाववासीयांनी आनंद व्यक्त केला .सिल्लोड- घाटनांद्रा या मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेडगाव येथे महामंडळाची एसटी बस जात नव्हती. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांना पायपीट करावी लागत होती. याची दखल घेऊन सरपंच रमेश पारखे, उपसरपंच काशीनाथ अंभोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिरंग सुस्ते यांनी पुढाकार घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना साकडे घालून पेडगाव येथे बस सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आगार प्रमुख समर्थ शेळके यांनी पेडगाव ते सिल्लोड बस सकाळी ८.३० वाजता सुरू करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावामधे एसटी बस आल्याने गावकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.पहिल्या दिवशी गावामध्ये आलेल्या बसचे गावकऱ्यांनी वाजतगाजत स्वागत केले. यावेळी वाहक सपकाळ, चालक गावंडे यांचा सत्कार करून एसटी महामंडळाचे आभार मानले. या बसमुळे आमठाणा, तळणी, भराडी व सिल्लोड येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या ६० ते ७० विद्यार्थ्यांची मोठी सोय झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रा.पं.स. नामदेव सुस्ते, शालेय अध्यक्ष धनराज शितळकर, श्रीरंग शितळकर, राजू हिंगमिरे, रमेश दगड, ईश्वर पारखे, बाबूराव अंभोरे यांची उपस्थिती होती.