शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:48 IST

सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यावरील अन्याय दूर व्हावा, त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या साहित्याद्वारे व्यापक विचार मंथन व्हावे या उद्देशाने सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी येथील शगुन मंगल कार्यालयात होणाºया या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत सहभागी होणार आहेत.संमेलनाचे राज्य निमंत्रक राजीव देशपांडे, सुभाष थोरात, संयोजन समितीचे सचिव आण्णा सावंत, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदे संमेलनाची भूमिका व कार्यक्रमांची रुपरेषा याबाबत माहिती दिली.१० सप्टेंबरला सकाळी साडेआठ वाजता नरसय्या आडाम यांच्या उपस्थितीत लोकशाही आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथ सन्मान मिरवणूक काढण्यात येणार आहे. दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन होईल.संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. आ.ह. साळुंखे यांच्यासह अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, कादंबरीकार दिनानाथ मनोहर, लेखक महावीर जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्य स्थिती या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. जयदेव डोळे, सईद अहेमद यांच्यासह गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्म संगिनी यांचा सहभाग असेल.सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान आकडा, आम्ही दोघं, परिवर्तनाचा जलसा हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री साडेआठ वाजता साहित्यिक रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. ११ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत श्रमिकांचे मुक्ती लढे आणि मराठी साहित्य या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये कादंबरीकार कुमान अनिल, सीटूचे प्रा. सुभाष जाधव, अमृत मेश्राम, लेखक रवींद्र चावरेकर, शिल्पा कांबळे, प्रभू राजगडकर, श्रीधर पवार, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. अक्रम पठाण हे विचार मांडणार आहेत.साडेअकरा ते दीड दरम्यान होणाºया तिसºया सत्रात ग्रामीण कष्टकरी आणि कला-साहित्य या विषावर समीक्षक डॉ. मनोहर जाधव, उद्धव भवलकर, सदानंद देशमुख, डॉ. के.जी.एनपुरे, डॉ. माधव गादेकर, राजाभाऊ भैलुमे, आनंद विंगकर सहभागी होणार आहेत. समारोप सत्रात श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने या विषयावर विचारमंथन होणार आहे.