शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पहिलीची फी लाखाच्या घरात; संस्थाचालकांनी मांडलेल्या बाजाराने सामान्यांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 20:12 IST

फीस आणि डोनेशनचे आकडे अधिकच फुगीर होत चालले आहेत आणि पालकही या प्रवाहात वाहत चालले आहेत, हे मात्र खरे. 

ठळक मुद्देअ‍ॅडमिशनची लगबग झाली सुरु सरकारी शिक्षणाचा घसरलेला दर्जा शिक्षणसंस्थांनी मांडलेला बाजार

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : ४० हजार रुपये डोनेशन आणि ५० हजार रुपये एका वर्षाची फी  ८० हजार रुपये डोनेशन आणि ६५ हजार रुपये एका वर्षाची फी, १ लाख २० हजार रुपये डोनेशन आणि ९० हजार रुपये एका वर्षाची फीस... असे चक्रावून टाकणारे आकडे कोणत्याही उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे नसून औरंगाबादमधील विविध शाळांची इयत्ता पहिलीची ही फी आहे. हे कळते तेव्हा सर्वसामान्यांचे डोळे अक्षरश: पांढरे होण्याची वेळ येते. सरकारी शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि याच तव्यावर पोळी भाजून खाजगी शिक्षणसंस्थाचालकांनी मांडलेला बाजार, यामुळे लहान मुलांचे शुल्क भरता-भरता मात्र सामान्यांचे कंबरडे मोडत चालले आहे.

मागच्या दहा वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. याच बदलामुळे हल्ली ज्यांचे मूल वय वर्षे ५ ओलांडून पुढे सरकते, अशा पालकांना तर दिवाळी सरताच अंगावर सर्रकन काटा येतो. हा काटा थंडीचा नसून आता बालकाच्या शाळा प्रवेशासाठी लागणाऱ्या भरमसाठ पैशांची तजवीज कशी करायची, या विचारातून आलेला आणि दिवसेंदिवस अधिकच वाढणारा असतो. मराठी संस्कारात वाढलेली आणि आता आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्थिरस्थावर असलेली बहुतांश सर्वसाधारण मराठी कुटुंबे आपल्या मुलांना मराठी शाळेतून शिक्षण देण्यास अजिबात तयार नाहीत, हे आजचे वास्तव आहे. मराठी शाळा तर नकोच नको, पण आता स्टेट बोर्डातूनही शिक्षण नको, असे म्हणणाऱ्या पालक ांचा आवाज दिवसेंदिवस बुलंद होत आहे. त्यामुळे सीबीएसई शाळांचे प्रस्थ वर्षागणिक वाढत चालले असून, जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच या शाळांचे प्रवेश फुल (आणि संस्थाचालक गलेगठ्ठ) होत आहेत, हे आजच्या शिक्षणव्यवस्थेचे बोचरे वास्तव आहे. 

मुलांचे करिअर उत्तम पद्धतीने घडवायचे असेल तर खाजगी इंग्रजी शाळा आणि त्यातही चकाचक, पॉश अगदी कॉर्पोरेट आॅफिसप्रमाणे वाटतील अशा सीबीएसई शाळांमध्ये शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही, अशी बहुतांश पालकांची समजूत झाली आहे किंवा तशी समजूत करून देण्यात शाळांचे संस्थाचालक यशस्वी ठरले आहेत. अनेक पालकांना खाजगी इंग्रजी शाळा हे ‘फॅड’ आहे, असे वाटते, त्यांच्या विचारांनाही ते पटते. घरचे वातावरण मराठी, राष्ट्रभाषा हिंदी आणि मुलांना शिक्षण देण्याची भाषा इंग्रजी हे सगळे आत्मसात करताना मुलांची किती त्रेधातिरपीट होऊ शकते, हेही पालकांना चांगलेच उमगते आहे. ‘मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्या’ हे साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी घसे कोरडे करून सांगितलेले वाक्यही अनेक पालकांना पटते. परंतु तरीही प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे इतर लोक जे करीत आहेत ते करणे आणि आपल्या पाल्यालाही त्याच प्रवाहात ‘स्वाहा’ म्हणून सोडून देणे, अशी अनेक पालकांची अवस्था झाली आहे. 

शाळा स्टेटस सिम्बॉल झाल्याने पालकाच्या खिशाला कात्रीपाल्यांची शाळा हा पालकांसाठी ‘स्टेटस’ सिम्बॉल झाला आहे. आपले मूल कोणत्या शाळेत किती डोनेशन भरून शिकते यावरून पालकांचा आर्थिक स्तर तपासला जातो. त्यामुळे अमुक एकाने एवढे डोनेशन भरले तर त्यापेक्षाही वजनदार डोनेशन भरून अधिक चांगल्या शाळेत पाल्याला टाकण्याचा आटापिटा पालकांकडून केला जातो. पालकांच्या नजरेत आपली शाळा भरावी म्हणून मग संस्थाचालक पण शाळेचे बाह्य सौंदर्य खुलविण्यात आणि शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त किती ‘एक्स्ट्रा अ‍ॅक्टिव्हिटीज’ घेतल्या जातात हे दाखविण्यासाठी शाळेच्या प्रांगणात एकेक आकर्षण उभे करतात आणि या बांधकामाचा खर्च पालकांच्या माथी  मारून मोकळे होतात. या सगळ्या भपक्यातून मुले प्रत्यक्षात किती आणि काय कलागुण शिकतात ते पालकांनाही बऱ्याचदा माहीत नसते. त्यामुळे आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या बाजाराला सरकारी शाळांचे अपयश हे तर मुख्य कारण आहेच, पण पालकांची बदललेली मानसिकता आणि त्याचा संस्थाचालकांनी घेतलेला फायदा, यामुळे फीस आणि डोनेशनचे आकडे अधिकच फुगीर होत चालले आहेत आणि पालकही या प्रवाहात वाहत चालले आहेत, हे मात्र खरे. 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा