शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

औरंगाबाद : आ. पंकजा पालवे यांनी २८ आॅगस्टपासून सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेला सुरुवात केली

औरंगाबाद : आ. पंकजा पालवे यांनी २८ आॅगस्टपासून सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेला सुरुवात केली असून, आज केंद्रीय मानवसंसाधनमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप करण्यात आला. जयभवानीनगर येथील चौकात आयोजित जाहीर सभेस भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, उपमहापौर संजय जोशी, शहराध्यक्ष बापू घडामोडे, माजी महापौर भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, शिरीष बोराळकर, संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सभेला संबोधित करताना पंकजा पालवे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाला अग्नी देतानाच मी शपथ घेतली होती, या राज्याला आणि देशाला तुमचे नाव विसरू देणार नाही. त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात कुठेच कमीही पडणार नाही. साहेब नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा मी लढणार आहे. भाजपाला महाराष्ट्रात टॉनिक देण्याचे काम करणार असून, वैभवशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे.केंद्रीय मानवसंसाधनमंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्याचे मान्य केले. पंकजा पालवे यांनी कोणत्याही निवडणुका नसताना ‘बेटी बचाव’अभियान राबविले. आता गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. आज यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा हा समारोप नसून, विजयाची सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.तत्पूर्वी प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी यात्रेला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल माहिती दिली. बापू घडामोडे यांनी प्रास्ताविक केले. सभेचे सूत्रसंचालन हेमंत खेडकर यांनी केले, तर आभार विजयराज साळवे यांनी मानले. यावेळी प्रवीण घुगे, अतुल सावे, नारायण कुचे, नगरसेवक बालाजी मुंडे, संजय चौधरी, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती. सभेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी एका उघड्या जीपमध्ये पंकजा पालवे यांची मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. मुकुंदवाडी, जालना रोड, गजानन महाराज मंदिर मार्गे रॅली जयभवानीनगर येथे पोहोचली. यावेळी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.