शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबादेत महाराष्ट्र बँकेला आग

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

धर्माबाद : येथील बँक आॅफ महाराष्ट्र बँकेला आग लागल्याने बँकेतील सर्व साहित्य, संगणक, दफ्तरऐवज, वाऊचर, व्यवस्थापकांचे कॅबिन जळून खाक झाले़

धर्माबाद : येथील बँक आॅफ महाराष्ट्र बँकेला आग लागल्याने बँकेतील सर्व साहित्य, संगणक, दफ्तरऐवज, वाऊचर, व्यवस्थापकांचे कॅबिन जळून खाक झाले़ ही घटना १० आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली़ शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ विशेष म्हणजे बँकेतील पैसे सुरक्षित असल्याचे सांगितले जाते़ आग विझविल्यानंतरही बँक व्यवस्थापन उपस्थित नव्हते, ते बाहेरगावी असल्याचे कळाले़शहरातील जि़प़ कन्या शाळा समोरील मुख्य रस्तयावर किरायाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बँक आॅफ महाराष्ट्र शाखा असून त्याखाली एटीएम आहे़ या बँकेतील व्यवस्थापकासह कर्मचारी ये-जा करीत असून १० आॅगस्ट रोजी रक्षाबंधन व रविवारची सुट्टी असल्याने सर्व कर्मचारी, मॅनेजर शनिवारी नेहमीप्रमाणे काम करून गावाकडे निघून गेले़ १० आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बँकेतून धूर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसले़ काही वेळातच आग फैलावली़ यात बँकेतील सर्व साहित्य, आठ संगणक, दोन प्रिंटर, दफ्तर ऐवज, वाऊचर, व्यवस्थापकाचे कॅबिन आदी साहित्य जळून खाक झाले़ बँकेच्या बाजूलाच एसबीएच बँकेचे सेक्युरिटी गार्ड बळीराम देवराव लहाने यांना माहिती मिळताच नगरपालिकेला त्यांनी संपर्क साधला़ अग्नीशमन गाडी आग विझविण्यासाठी आली़एसबीएच बँकेचे सेक्युरिटी पी़व्ही़ गोरे, नारायण कोंडुरे, पाईकराव, सूर्यतळे आणि याच बँकेतील सेवक शशिकांत वाघमारे, दत्ता नाईकवाड यांनी आत जावून धूर बाहेर जाण्यासाठी काचा फोडल्या व आग विझविण्याचा प्रयत्न केला़ तसेच धर्माबाद पोलिस ठाण्याचे पो़नि़ अनंत पराड, पोलिस उपनिरीक्षक गिरी ओमकार तत्काळ उपस्थित झाले़ बँक व्यवस्थापक बाहेरगावी असल्याने आग विजेपर्यंत घटनास्थळी आले नव्हते़ बँक आॅफ महाराष्ट्र शाखेला सेक्युरिटी गार्ड नाही़ येथील कर्मचारी ये-जा करीत असून स्थानिक ठिकाणी असते तर एवढी मोठी घटना घडली नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे़ सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे़ (वार्ताहर)