शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाचे २८ कोटी लटकणार !

By admin | Updated: December 28, 2016 00:02 IST

बीड : मागासवर्गीय वस्त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीच्या वितरणावरुन जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांतच बेबनाव आहे

बीड : मागासवर्गीय वस्त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीच्या वितरणावरुन जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांतच बेबनाव आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ देत जि.प. ची मुदत संपण्याच्या तीन महिने आधी स्वेच्छा निधीतून कामे करता येणार नाहीत असे पत्राद्वारे नुकतेच सीईओंना कळविले आहे. त्यामुळे तब्बल २८ कोटी अखर्चीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तेराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधी ग्रामपंचायतींमार्फत मागासवर्गीय बहुल वस्त्यांमध्ये खर्च करावयाचा होता. जि.प. ला नियोजन समितीने त्यासाठी २८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी एकट्या आष्टी तालुक्यात एक कोटी रुपयांचा निधी वळविला. त्याला सत्ताधारी गटाच्याच काही सदस्यांनी आक्षेप घेतला. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनाही गर्जे यांची ही खेळी रुचली नाही. त्यांनी आष्टीचा एक कोटी रुपयांचा निधी रोखून गर्जेंवर पलटवार केला. त्यानंतर समाननिधी वाटपासाठी खंडपीठात याचिका दाखल झाली. त्याची तार पंडितांना जोडलेली आहे, हे देखील सर्वश्रूत आहे. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी जि.प. मध्ये पार पडलेल्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपावरुन खडाजंगी होण्याची शक्यता होती;परंतु तसे काही घडलेच नाही. मात्र, पंडित विरुद्ध गर्जे यांच्यातील छुपे युद्ध काही शमलेच नाही. तथापि, जि.प. ची मुदत २० फेबु्रवारी रोजी संपत आहे. आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत २८ कोटी रुपये लटकणार असल्याचे संकेत मिळत होते. याला पुष्टी देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओंना पाठविले आहे. निवडणूक विभागाच्या सूचनेचा संदर्भ यात दिलेला आहे. त्यामुळे जि.प. प्रशासनापुढे पेच वाढला असून आता प्रशासकीय मान्यतेची आशा जवळपास मावळली आहे. यासंदर्भात अतिरिक्त सीईओ धनराज नीला म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. निधी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)