शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

अखेर शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेला सापडला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:33 IST

ग्रामपंचायत निवडणूक आचार संहितेमुळे तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडला आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील १४ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणूक आचार संहितेमुळे तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडला आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील १४ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांतील उत्कृष्ट कार्य करणाºया शिक्षकांना दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. याही वर्षी शिक्षक दिनापूर्वीच या पुरस्क ारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले होते. तालुकानिहाय दोन या प्रमाणे नऊ तालुक्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून, तर विशेष शिक्षकाच्या एका पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले; परंतु प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी सोयगाव तालुक्यातून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. विशेष शिक्षक पुरस्कारासाठीही जिल्ह्यातील एकही प्रस्ताव नाही. नऊ माध्यमिक शिक्षक पुरस्कारांपैकी अवघे ६ प्रस्ताव आले असून, यासाठी सिल्लोड व सोयगाव तालुक्यांतून एकही प्रस्ताव आलेला नाही.जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्रस्तावांची छाननी करून यादी अंतिम केली. सदरील यादीला विभागीय आयुक्तांचीही मंजुरी मिळाली; पण ग्रामपंचायत निवडणुकीची आचार संहिता उठली, तरी पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर शिक्षण सभापती मीनाताई शेळके व डोणगावकर यांनी १९ डिसेंबर रोजी पुरस्कार वितरणाचा समारंभ ठेवण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.हे आहेत जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकप्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले औरंगाबाद तालुक्यातील अंकुश इत्थर, पैठण तालुक्यातील चंद्रकांत घोडके, गंगापूर तालुक्यातील बालचंद गोरे, वैजापूर तालुक्यातील प्रभाकर बारसे, कन्नड तालुक्यातील सारिका जांभळे, खुलताबाद तालुक्यातील परमेश्वर गोटे, सिल्लोड तालुक्यातील विजया चापे आणि फुलंब्री तालुक्यातील बाबूराव गाडेकर हे शिक्षक आहेत.माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी पैठण तालुक्यातील रेणुका माळेवाडीकर, गंगापूर तालुक्यातील लक्ष्मण जावळे, वैजापूर तालुक्यातील अरुण शिंदे, कन्नड तालुक्यातील उदयराम घावरी, खुलताबाद तालुक्यातील वसंतराव राठोड आणि फुलंब्री तालुक्यातील प्रतिभा पाईकराव या सहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.