शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर लच्छू पहिलवान अटकेत

By admin | Updated: July 18, 2016 01:13 IST

शहरातील एका नगरसेविकेचे वडील लच्छू पहिलवान ऊर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया आणि त्यांचा मुलगा लुमेश बाखरिया यांना रविवारी मध्यरात्री धावणी मोहल्ला येथून पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अनेक दिवसांपासून पोलिसांना वाँटेड असलेल्या शहरातील एका नगरसेविकेचे वडील लच्छू पहिलवान ऊर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया आणि त्यांचा मुलगा लुमेश बाखरिया यांना रविवारी मध्यरात्री धावणी मोहल्ला येथून पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उद्धवराव पाटील चौकातून रमीज खान इब्राहिम खान आणि त्यांचे मित्र तरबेज पठाण हे कारमध्ये बसून जात होते. त्यावेळी बाखरिया रस्त्यात उभे होते. तेव्हा तरबेज पठाण यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने बाखरियांनी रमीज आणि तरबेज यांना कारमधून बाहेर ओढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. स्टीलचा रॉड, फायटर आणि लाकडी दांड्याने या तरुणांना मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात अनेक दिवस उपचार घ्यावे लागले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लच्छू पहेलवान फरार झाले होते. लच्छू पहेलवान हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांची कन्या नगरसेविका आहे. लच्छू पहेलवान यांचा या घटनेशी संबंध नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते, पण पोलीस आयुक्तांनी कोणताही हस्तक्षेप न करता थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पाच महिन्यांनंतरही आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खडसावले. दरम्यान, लुमेश हा धावणी मोहल्ला येथील घरी असल्याची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सलीम शेख यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास लुमेशला पकडले. लुमेशला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच धावणी मोहल्ल्यात खळबळ उडाली. त्यानंतर पहाटे ३ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक पवार, उपनिरीक्षक अमित बागूल, राहुल बांगर आणि कर्मचाऱ्यांनी लच्छू पहेलवान यांना अटक केली. तर तिसरा आरोपी गोट्या ऊर्फ शैलेश यास रविवारी सायंकाळी पोलिसांनी पकडले.