शिरुर : शौचालय कामातील ३६ लाखांचा अपहार तसेच घरकुलांचा निधी शौचालयांसाठी वळविल्याने प्रभारी गटविकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी चांगलेच अडचणीत आले होते. त्यांना सोमवारी गटविकास अधिकारी पदावरुन हटवून सीईओ राजीव जवळेकर यांनी चांगलाच दणका दिला. शिरुर तालुक्यातील शौचालय कामांतील अनियमिततेचा ‘लोकमत’ने पर्दापाश केला होता. शौचालये बांधण्यापूर्वीच नियमबाह्यपणे रक्कम ग्रामपंचायतींना वाटली होती. शिवाय घरकुलांसाठी आलेला निधीही शौचालयांसाठी वळविला होता. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्यावर त्याची सीईओ राजीव जवळेकर यांनी दखल घेतली. पंचायत विभागाकडून चौकशीचा ससेमिराही सुरु झाला होता. सीईओ जवळेकर यांनी सूर्यवंशी यांचा ‘चार्ज’ काढण्यात आला. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले़ आता त्यांना कृषी अधिकारी या मूळ पदावर काम पहावे लागणार आहे.मोराळे यांच्याकडे चार्जशिरुर येथील गटविकास अधिकारीपदाचा प्रभारी ‘चार्ज’ सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते वर्ग २ चे असतानाही त्यांना डावलून वर्ग ३ च्या सूर्यवंशी यांना संधी मिळाली होती़ आता मोराळे यांना न्याय मिळाला आहे. प्रशासनास शिस्त आणण्याचा प्रयत्न केला जाईल. नियमबाह्य कामांना थारा देणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.जि.प. सदस्य रामराव खेडकर, दशरथ वनवे, सुरेश उगलमुगले, प्रकाश खेडकर, बाळासाहेब केदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. (वार्ताहर)'लोकमत'चा पाठपुरावाशिरुर तालुक्यातील शौचालय कामातील अपहार प्रकरण, घरकुलाचा निधी शौचालयासाठी वळविल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले होते़ त्यानंतर सूत्रे हलली़
अखेर सूर्यवंशींचा पदभार काढला
By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST