शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर बिंदू नामावली मंजूर

By admin | Updated: June 16, 2017 23:36 IST

नांदेड:बिंदू नामावली मंजूर झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार ८५२ शिक्षकांची पदे मंजूर होणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग आता मोकळा झाल्याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे़ बिंदू नामावली मंजूर झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार ८५२ शिक्षकांची पदे मंजूर होणार आहेत. यापूर्वी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण किचकट व वेळखाऊ होते़ संबंधित शिक्षकाला स्वत:ची आंतरजिल्हा बदली करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्यावर मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागत होते़ त्यानंतर हा प्रस्तावावर ज्या जिल्हा परिषदेत बदली करून घ्यायची आहे, तेथे सादर करावा लागत होता़ या प्रक्रियेत संबंधित शिक्षकांचा वेळ वाया जात होता़ तसेच प्रस्तावही पुढे जात नव्हता़ त्यामुळे अनेक शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असूनही प्रस्ताव तयार करत नव्हते़ तर काही शिक्षक प्रस्ताव सादर केल्यानंतरही बदलीची आशाच सोडून देत होते़ मात्र यावर्षी शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले़ आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्ह्याची बिंदू नामावली तयार करणे आवश्यक आहे़ परंतु अनेक जिल्हा परिषदांनी बिंदू नामावलीच तयार केली नाही़ तर नांदेड जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीची १२ वर्षांपासून तपासणीच झाली नव्हती़ २००४ मध्ये बिंदू नामावली मागासवर्ग कक्ष, औरंगाबाद यांच्याकडून तपासली होती़ १२ वर्षे होवून गेले मात्र अद्याप बिंदू नामावलीची तपासणी झाली नसल्याने काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता़ रोष्टरनुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक रोष्टर मंजूर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला़दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रोष्टर १५ जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात मंजूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले़ आंतर जिल्हा बदलीच्या १६२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.