शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावर अखेर तोडगा

By admin | Updated: August 27, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : अतिरिक्त शिक्षकांचे तालुकास्तरावर समयोजन झाल्यानंतरही जिल्हाभरातून तब्बल १०३ गुरूजी अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या समायोजनाचा पेच निर्माण झाला होता.

उस्मानाबाद : अतिरिक्त शिक्षकांचे तालुकास्तरावर समयोजन झाल्यानंतरही जिल्हाभरातून तब्बल १०३ गुरूजी अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या समायोजनाचा पेच निर्माण झाला होता. एवढया प्रमाणात जागा रिक्त नसल्याने बऱ्याचशा शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार होते. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी यातून मार्ग काढीत संबंधित अतिरिक्त गुरूजींना पाचवी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त्या दिल्या. ही प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.वर्षागणिक जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होवू लागली आहे. त्यामुळे विशेषत: मागील दोन-तीन वर्षांपासून दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनत आहे. यंदाही जिल्ह्यात काही वेगळे चित्र नाही. अतिरिक्त गुरूजींचे तालुकास्तरावर समायोजन केल्यानंतरही १०३ च्या आसपास प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले होते. मात्र, जिल्ह्यात एवढया प्रमाणात जागा रिक्त नव्हत्या. परिणामी बऱ्याच शिक्षकांना अन्य जिल्ह्यात जावे लागणार होते. त्यामुळे शिक्षकांमध्येही खळबळ उडाली होती. शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्यास काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. तसेच त्यांनी शासनस्तरावर पाठपुरवाही केला होता.दरम्यान, शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी यातून मार्ग काढला. जिल्हा परिषदेच्या १३८ शाळांना नव्याने आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक देण्यात आले नव्हते. काही शाळांवर पाचवी, सहावी आणि सातवीच्या वर्गांनाही पुरेशे शिक्षक नव्हते. तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत होते. ही बाब लक्षात घेवून रावत यांनी ‘शासनाची मान्यता घेण्याच्या अधीन राहून’ उपरोक्त अतिरिक्त शिक्षकांना पाचवी ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.त्यानुसार मंगळवारी दुपारी समायोजनाची प्रक्रिया ठेवण्यात आली होती. प्रभारी शिक्षणाधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास १०३ प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. यामध्ये पाच ते सहा ठिकाणी पाचवीच्या वर्गाला शिक्षक देण्यात आले. तर उर्वरित गुरूजींचे नव्याने जोडण्यात आलेल्या आठवीच्या वर्गावर समायोन केले. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या गुरूजींचा प्रश्न तुर्तास मिटला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनानंतर अतिरिक्त असलेल्या १५ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)