शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीक्सचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 29, 2014 00:25 IST

नांदेड : आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याच्या शासन निर्णयाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली.

नांदेड : आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याच्या शासन निर्णयाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ३ हजार तर राज्यातील ८२ हजार आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना होणार आहे.महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अ‍ॅक्ट १९६१ च्या कायद्यातील कलम २५ मध्ये ४ व ५ या उपकलमांचा यात समावेश करण्यात आला. यासंदर्भातील अ‍ॅक्ट मान्य करुन जाहीर करण्यात आला. आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसनीची उपचार पद्धत वापरण्याबाबतची मागणी १९७३ पासूनची होती. या मागणीची दखल घेऊन तत्कालीन आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांनी १९९२ मध्ये अद्यादेश काढून मॉडर्न मेडिसीन वापरण्याबाबतची परवानगी दिली होती. मात्र त्याला कायद्याचे संरक्षण नव्हते. त्यामुळे १९९९ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० च्या अंतर्गंत दुसरा अध्यादेश जारी केला. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अ‍ॅक्ट १९६१ च्या कायद्यात या उपचारपद्धती वापरण्यााबाबत परवानगी नसल्याने त्यास कायद्याचे संरक्षण नव्हते. या दोन्ही अद्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी युनानी व आयुर्वेद डॉक्टरांनी तब्बल २२ वर्षे लढा दिला. दरम्यान, याकामी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी महत्वाची भूमिका मांडल्याबद्दल मॅग्मो (ंआयुर्वेद)च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. उत्तम इंगळे, डॉ. मो. मोईमोद्दीन, डॉ. अविनाश वाघमारे, डॉ. पलीकोंडवार, डॉ. कस्तुरे, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गंत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे, डॉ. किलजे, डॉ. भंडारे, डॉ. पठाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पदव्युत्तर पदवीधारकांना लाभमहाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स वापरण्याच्या कलम २५ मध्ये कलम ४ चे उपक्रम निर्माण करण्यात आले. १९९२ मध्ये जारी केलेल्या अध्यादेशात शेड्यूल अ, अ १, ब आणि ड उपक्रम यांचा अ‍ॅलोपॅथी चिकित्सा वापरण्याच्या अधिकाराचा या उपक्रमात समावेश झाला, उपक्रम ५ निर्माण करुन पदव्युत्तर ५ निर्माण करुन पदव्युत्तर व्यावसायिकाची कार्यकक्षा ठरविण्यासाठी त्यांचा अभ्यासक्रम व प्रशिक्षणानंतर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबतचे अधिकार देऊ केले आहेत.