शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा शाळांची मान्यता धोक्यात

By admin | Updated: July 6, 2016 00:21 IST

औरंंगाबाद : शाळेला मान्यता एका ठिकाणची; परंतु ती भरते दुसऱ्याच ठिकाणी. यासंदर्भात शिक्षण विभागालादेखील संबंधित संस्थाचालकांनी अंधारात ठेवले आहे.

औरंंगाबाद : शाळेला मान्यता एका ठिकाणची; परंतु ती भरते दुसऱ्याच ठिकाणी. यासंदर्भात शिक्षण विभागालादेखील संबंधित संस्थाचालकांनी अंधारात ठेवले आहे. नुकतेच आरटीई कायद्यानुसार राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे शाळांचा हा उद्योग समोर आला. जिल्ह्यात अशा १५ शाळा असून नियमाप्रमाणे त्या सर्व शाळांची मान्यता रद्द होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली.आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वच शासन मान्य शाळांना बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीला शाळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्यावेळी काही शाळांनी मूळ मान्यता असलेल्या ठिकाणचा पत्ता नोंद केला होता. त्यानंतर २५ टक्के मोफत जागांवर विद्यार्थ्यांचे नंबर लागले. प्रवेश घेण्यासाठी पालक संबंधित पत्त्यावर गेले तेव्हा परिसरातून शाळाच गायब होत्या. अनेक पालकांनी नमूद पत्त्यावर शाळा सापडत नसल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे यासंबंधीच्या तक्रारींचा ओघ वाढत राहिला. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींची सत्यता पडताळून पाहिली असता सदरील शाळांनी सुरुवातीला एका ठिकाणची शासनाची मान्यता घेताना; परंतु विद्यार्थी संख्या अपुरी पडू लागल्यामुळे त्या शाळांनी परस्पर दुसऱ्याच ठिकाणी शाळा सुरू केली. मात्र, आरटीई प्रवेशप्रक्रियेवेळी त्या शाळांनी आॅनलाईन नोंदणी करताना मूळ पत्ता नमूद केलेला होता. प्रत्यक्षात शाळांचे स्थलांतर करताना शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, या शाळांनी परस्पर दुसऱ्या परिसरात स्थलांतर केले आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेमुळे अशा शाळांचे पितळ उघडे पडले. ज्या शाळा स्थलांतर करण्यापूर्वी शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय ज्या शाळा परस्पर स्थलांतर करतात, त्यांची मान्यता शासन निर्णयानुसार आपोआप रद्द होते. यासंबंधी शिक्षण विभागाकडून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. परस्पर स्थलांतर केलेल्या शाळांमध्ये अनेक नामांकित संस्थांच्या शाळांचा समावेश आहे.