शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

इच्छुकांकडून निवडणुकीची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: August 21, 2014 01:20 IST

संतोष धारासूरकर , जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवू इच्छिणारे पुढारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी पटकविल्याच्या थाटात आपापल्या कार्यक्षेत्रात

संतोष धारासूरकर , जालनाजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवू इच्छिणारे पुढारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी पटकविल्याच्या थाटात आपापल्या कार्यक्षेत्रात मोर्चेबांधणी करण्यासह लढतीपूर्वीच प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणण्याच्या खेळ््यांमध्ये दंग झाले आहेत.या महिन्यात आठ दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, आॅक्टोबर महिन्यात दिवाळीपूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या आचारसंहितेचे वेध ओळखून या जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात राजकीय पुढारी कमालीचे सक्रिय झाले आहेत. लोकसभा म्हणजे विधानसभेची तालीम असे समजून अनुभवी पुढाऱ्यांनी त्या निवडणुकीद्वारेच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्या निवडणुकांतील जय - पराजयाचे सुद्धा लगचेच विश्लेषण सुरु करीत अनुभवी पुढाऱ्यांनी महिनाभर आत्मचिंतन सुद्धा केले. तेथूनच हे पुढारी विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी जुंपले. या जिल्ह्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या आमदारांनी किंवा गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली. अन्य इच्छुक सुद्धा धूळ झटकून उभे राहिले. सक्रिय झाले. झपाट्याने कामास सुद्धा लागले. परिणामी गेल्या दोन अडीच महिन्यांत या जिल्ह्यात सत्तारुढ व विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यक्रमांचा धूमधडका सुरु केला. भूमिपूजने, उद्घाटने वगैरे कार्यक्रमांचा तडाखा आजवर सुरु आहे. तर छोट्या मोठ्या विषयांवरसुद्धा आंदोलनात्मक कार्यक्रमांचाही धडाका सुरु आहे. निवेदने, निदर्शने, धरणे, रास्तारोको, मोर्चे, वगैरे आंदोलनांनी जिल्हा दणाणून गेला आहे. गेल्या महिनाभरापासून विद्यमान आमदार आपणास तिकीट मिळाल्याच्या थाटातच वावरत आहेत. त्यात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारही मागे नाहीत. पक्ष श्रेष्टींनी हिरव्या कंदिल दाखविल्याच्या थाटात या सर्वांनी लढतीच व्यूहरचनाही सुरु केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या आघाडीतील शिवसेना- भारतीय जनता पक्ष या युतीतील मित्र पक्षांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाजपक्ष, समाजवादी पक्षातील इच्छुक कमालीचे सक्रिय झाले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळासह गेल्यावर्षीची गारपीट व या वर्षीची दुष्काळी सदृश स्थिती ओळखून या इच्छुकांनी आपापल्या कार्य क्षेत्रात सर्व सामन्य शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून दिलासा देण्याचे व त्यांना आकर्षित करण्याचे सर्वार्थाने प्रयत्न सुरु केले आहेत. परिणामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील पाचही मतदार संघात प्रमुख पक्षांनी आतापासूनच प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्धी उमेदवार संपूर्ण मतदारसंघात टोकाचा प्रचार करतील, अशी चिन्हे आहेत. विद्यमान आ. कैलास गोरंट्याल हे पुन्हा भवितव्य आजमिवणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून दीड-दोन महिन्यांपासून त्यांनी कार्यक्रमांचा धूमधडाका सुरु केला. तर मित्र पक्षातील रशिद पहेलवान यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन बसपात प्रवेश करीत काँग्रेसजनात अस्वस्थता पसरवली. माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी घनसांवगीऐवजी पुन्हा जालन्यातून उत्सुकता दर्शवून मोर्चेबांधणी सुरू केली. त्यामुळे स्वकीय भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मनसेकडून रवि राऊत, भारिपकडून सुधाकर निकाळजे उत्सुक आहेत.प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर चौथ्यांदा पोहचलेल्या व पाठोपाठ केंद्रिय मंत्रिमंडळात स्थान पटकविणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी भोकरदनची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांचे सुपूत्र संतोष दानवे, शिवाजीराव थोटे, रमेश गव्हाड हे तिघे भाजपकडून तर विद्यमान आमदार चंद्रकांत दानवे, राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादीकडून उत्सुक आहेत. काँग्रेसचे एल.के.दळवी, मनसेचे सांडूअण्णा पुंगळे, रावसाहेब भवर, दिलीप वाघ हेही इच्छुक आहेत. परंतु दानवेंविरुद्ध दानवेच अशी लढत होईल, असे सकृतदर्शनी चित्र जाणवत आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांनी लोकसभेपासूनच घनसावंगीत मोर्चेबांधणी सुुरु केली. संघटन कौशल्याच्या माध्यमातून मोठी फळी उभी केलेल्या टोपे यांनी कार्यक्षेत्रात ठिय्या मांडला आहे. या उलट खोतकर यांनी येथून माघार घेतल्यानंतर शिवसेनेत उमेदवाराचा घोळ सुरू आहे. शिवाजीराव चोथे, लक्ष्मण वडले की अन्य कोणास टोपेंविरोधात रिंगणात उतरवावे असा प्रश्न पडला आहे. माजी आ. विलासराव खरात यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनेच मध्यंतरी जोर धरला. शिष्टमंडळे मुुंबईत गेली. चर्चा अधुरी आहे. मनसेकडून सुनील आर्दड हे इच्छुक आहेत.गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. सुरेश जेथलिया आता काँग्रेसकडून इच्छुक आहेत. परंतु वाटेवरील जेथलिया यांना अद्यापपर्यंत काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्तच लागला नाही. तरुण नेते राजेश राठोड, अन्वर देशमुख काँग्रेसकडून दावा करीत आहेत. तर ‘राष्ट्रवादी’च्या बाबासाहेब आकात यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरु केली. सोशल मिडियात चर्चा रंगविली. त्याद्वारे मित्रपक्षांसमोर प्रश्न उभा केला आहे. भाजपाच्या बबनराव लोणीकर यांच्यासमोर प्रा. राजेश सरकटे यांनी प्रश्न उभा केला आहे. सरकटे यांच्या सक्रियतेने व आक्रमकतेने ते अस्वस्थ आहेत.शिवसेना आ. संतोष सांबरे यांनी दुसऱ्यांदा बदनापूरमधून भवितव्य अजमविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ते प्रचारात गुंतले आहेत. गेली निवडणूक मनसेकडून लढविलेल्या माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी यांनी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरु केली तर मनसेकडून सुदामराव सदाशिवे, माऊली गायकवाड हे उत्सुक आहेत. अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांच्यासह अन्य इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच प्रचारयुद्ध आतापासूनच रंगले असून त्यामुळे मतदार संभ्रम अवस्थेत आहेत.