परतूर : तालुक्यात शेततळ्यांची कामे गतीने सुरू असून महिनाअखेर मंजूर तळ्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्रच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी पातळी दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाण्याचे नियोजन करणे भाग पडत आहे. यामुळे आपल्या शेतात शेततळे घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात ुपुढे येत आहेत. तालुक्यात राष्ट्रीय कृषी फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत १२ शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे. या बारा शेततळ्यांना २५ लाख रूपये अनुदान आले आहे. हे अनुदान तुटपुंजे आहे. मात्र हे सर्व शेतकरी अनुदानाबारोबरच स्वत:चे काही पैसे खर्च करून ही तळ्याची कामे स्वयंस्फूर्तीने पूर्ण करत आहेत. या बारा तळ्यांपैकी येणोरा २, कावजवळा १, पाटोदा माव १ असे चार तळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर रायूपर शिवारात एक तळ्याचे काम चालू आहे. हे शेत तळे पूर्ण होउन प्लास्टिक अंथरल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे. सदरील तळ्यांच्या लाभार्थींची निवड ही काटेकोर व गरजूनांच हे तळे मिळाल्याने ही कामे गतीेन पूर्ण होत आहे. महिनाअखेर ही सर्व कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. रायपूर शिवारात शुभारंभतालुक्यातील रायपूर शिवारात ्र दि. १४ फेब्रुवारी रोजी या शेततळे कामाचा शुभांरभ हभप सोपानराव केकते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विठ्ठलराव काळुंके, मदन भापकर, देविदास भापकर, लिंबाजी पवार, लक्ष्मण काळुंके, दत्ता काळुंके सह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
महिनाअखेर मंजूर तळ्यांची कामे पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 00:10 IST