जालना : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून आधुनिक शेतीची कास धरावी आणि भरघोस उत्पादन काढावे, असे आवाहन नाबार्डचे जिल्हा सरव्यवस्थापक पी. जी. भागवतकर यांनी केले.सायगाव येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, लोकशक्ती बहुउद्देशिय स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने दुग्धेश्वर शेतकरी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण भागवतकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष शरद शिंदे, अर्जुन गायकवाड यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना भागवतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कर्ज मिळाले पाहिजे व शेतकऱ्यांनी ते शेतीच्या बी-बीयाणे, खते खरेदीसाठी वापरले पाहिजे. त्यामुळे शेतीतून भरघोस उत्पादन मिळेल. उत्पन जर चांगले निघाले तर शेतकरी आपोआपच बँकाचे कर्ज तातडीने फेडेल. त्यामुळे बॅँकेत शेतकऱ्यांची पत वाढेल. सेंद्रिय पध्दतीने झिरो बजेट शेती करण्याची गरज असल्याचे भागवत म्हणाले. पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेती करणे मोठे जिकरीचे झाले आहे. बेभरोशाच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीजवळ पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे गरज आहे.तसे काम काम दुग्धेश्वर मंडळांनी करावे, असे मत लोकशाही संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम राजपूत यांनी व्यक्त केले. यावेळी सहकारी बँकेचे मॅनेजर गुळवे, सुभाष बरवळे, मुक्ताताई बरंडे, जानकाबाई बरवळे, निवृत्ती गायकवाड, पदमा गायकवाड, दादाराव थोरात, अरूणा निलपल्लेवार, व्यंकट शिंदे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
‘आधुनिक पध्दतीने शेती करा’
By admin | Updated: July 12, 2014 01:17 IST