शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आदेशाने शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:48 IST

पिकविम्यासाठी शेतकºयांच्या अडचणी संपत असल्याचे दिसत असतानाच बुधवारी दाखल झालेल्या नव्या आदेशाने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे़ बँकांमध्ये सुरळीतपणे पिकविमा स्वीकारला जात असतानाच तो स्वीकारू नये, असे आदेश मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले़ बुधवारी ठिक ठिकाणी रस्त्यावर येवून शेतकºयांनी संताप व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पिकविम्यासाठी शेतकºयांच्या अडचणी संपत असल्याचे दिसत असतानाच बुधवारी दाखल झालेल्या नव्या आदेशाने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे़ बँकांमध्ये सुरळीतपणे पिकविमा स्वीकारला जात असतानाच तो स्वीकारू नये, असे आदेश मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले़ बुधवारी ठिक ठिकाणी रस्त्यावर येवून शेतकºयांनी संताप व्यक्त केला़जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पिकविम्याचे अर्ज भरण्यासंदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहिले होते़ असे असताना पिकविम्याला अखेर मुदतवाढ मिळाल्याने शेतकºयांचा जीव भांड्यात पडला़ सोमवारी बँकांमध्ये सुरळीतपणे विमा रक्कम स्वीकारली जात होती; परंतु, बुधवारी दुपारी शासनाचा नवा आदेश येवून धडकला. या आदेशानुसार बँकांना पिकविमा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, हा विमा केवळ ई-महासेवा केंद्रावरच भरावा, असे आदेश दिले़ त्यामुळे बँकांनी चक्क शटर बंद करून आणि नोटीस लावून विमा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला़ या प्रकारामुळे शेतकºयांत संतापाची लाट पसरली़ अनेक ठिकाणी तर शेतकºयांनी रस्त्यावर येवून आपला संताप व्यक्त केला़ गंगाखेड येथे ३ तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़पाथरी, मानवतमध्ये बँकांचा नकारपाथरी आणि मानवत या दोन्ही तालुक्यात बँकांनी २ आॅगस्टपासून विमा घेण्यास नकार दिला आहे़ त्यामुळे शहरातील महा-ई-सेवा केंद्रांवर शेतकºयांची गर्दी झाल्याचे दिसून आले़ मानवत येथील जिल्हा बँकेत ३१ जुलैपर्यंत ५ हजार ९५९ शेतकºयांनी ६६ लाख १६ हजार ४०९ रुपयांचा विमा भरला आहे़ १ आॅगस्ट रोजी ९० शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यात आले़ पाथरी येथील स्टेट बँकेत ३१ जुलै अखेर १ हजार ५३ शेतकºयांनी विमा भरला़ १ आॅगस्ट रोजी २५ शेतकºयांचा विमा भरणे झाले आहे़येलदरीत शेतकरी वंचिततालुक्यातील येलदरी येथे जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक, सेतू सुविधा केंद्रात शेतकºयांनी दहा दिवसांपासून गर्दी केली होती़ बुधवारी बँकेने चक्क शटर ओढून घेतले आणि विमा भरून घेण्यास नकार दिला़ त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा लालफितीच्या फेºयात अडकला आहे़ येथील सेतू सुविधा केंद्रावर फक्त बिगर कर्जदार शेतकºयांचाच पिकविमा भरून घेतला जात आहे़ त्यामुळे कर्जदार शेतकºयांवर संकट कोसळले आहे़सेलूत शेतकरी संतापलेसेलू येथील पाथरी रोडवरील जिल्हा बँकेच्या शाखेत सकाळी ११़३० च्या सुमारास पीक विमा घेतला जात नसल्याने शेतकºयांनी गोंधळ केला़ त्यानंतर तहसीलदार स्वरुप कंकाळ बँकेत आले़ बँकेच्या अधिकाºयांनी शासनाचा नवीन आदेश दाखविला़ त्यानंतर कंकाळ यांनी शेतकºयांची समजूत काढली़ त्यानंतर शेतकरी निघून गेले़ त्यानंतर शहरातील खाजगी इंटरनेट केंद्रांवर शेतकºयांची गर्दी झाली होती़पुर्णेत ४ नंतर प्रक्रियापूर्णा शहरात बुधवारी सकाळी सर्व्हर बंद असल्याने सायंकाळी ४ वाजेनंतर पीक विमा स्वीकारण्यास प्रारंभ झाला़ केवळ बीगर कर्जदार शेतकºयांचेच अर्ज स्वीकारले गेले़जिंतूरातही संभ्रमजिंतूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकºयांचा पिकविमा स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकरी संभ्रमात आहेत़ बुधवारी बँक व्यवस्थापनाने विमा स्वीकारणार नसल्याचे लेखी पत्र दिल्याने सुमारे ५०० शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़