शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

केळगाव परिसरातील शेतकरी बोंडअळीने हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:22 IST

केळगाव : कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन खर्चही शेतकरी बांधवांना झेपेनासा झाला आहे. अखेर अनेक ...

केळगाव : कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून उत्पादन खर्चही शेतकरी बांधवांना झेपेनासा झाला आहे. अखेर अनेक शेतकरी कपाशी मोडून तिला जाळून टाकीत आहेत. या विदारक परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रवर्षीप्रमाणे यंदाही कपाशीवर बोंडअळीचे संकट उभे राहिले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या हाती केवळ चाळीस टक्के कापूस पडला आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे, सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील गणेश ईवरे यांनी तीन एकरातील कपाशी पिक चिमट्याच्या सहाय्याने मोडून टाकले. आजवर योग्य व्यवस्थापन करीत त्यांनी पीक जोपासले कपाशीवर चार ते पाच वेळा फवारणी केली प्रत्येक कपाशीच्या बोंडात अळी असल्याने उत्पादन येण्याची चिन्हे दिसून आली. कापूस वेचणीला खर्चही वाढलेला आहे. उत्पादन अत्यंत कमी दिसत असल्याने चिमट्याच्या व ट्रक्टर चालवत आहेत पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.

पाहणी करून मदत करावी

सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने कापसाला चांगलाच फटका बसला आहे. तरीही कापसाकडून चांगल्या उत्पादनाची आस लागलेल्या शेतकर्‍यांना बोंडअळीमुळे निराशा पसरली आहे. ओलीत क्षेत्रात एकरी दहा ते बारा क्विंटल कापूस पिकत असे. तिथे केवळ तीन ते चार क्विंटल कापूस शेतकर्यांच्या हाती लागला. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणे कठीण झाला आहे. काही ठिकाणी शेतात कापसाचे पीक अद्यापही आहेत, मात्र तिथे बोंडअळ‌ीने उद्रेक केला आहे. अखेर निराशाजनक परिस्थिती पाहता शेतकरी कपाशी मोडून त्याला पेटवून देत आहेत. बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पाहणी करून शेतकर्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

फोटो - चिमट्याच्या सहाय्याने कपाशी उपटून टाकताना शेतकरी बांधव