शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला सोळा कोटींचा पीक विमा

By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST

जालना : गतवर्षी पीक विमापोटी शासनाने ४४ कोटी ६४ लाख रूपयांची मदत दिली. त्याचा मोठा आधार मिळाल्याने यंदाच्यावर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी १६ कोटी ६१ लाख रूपयांचा पीक विमा उतरविला आहे.

जालना : गतवर्षी पीक विमापोटी शासनाने ४४ कोटी ६४ लाख रूपयांची मदत दिली. त्याचा मोठा आधार मिळाल्याने यंदाच्यावर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी १६ कोटी ६१ लाख रूपयांचा पीक विमा उतरविला आहे. यापेक्षाही जास्त नोंदणीची अपेक्षा होती. मात्र महसूल विभागाने पीक विमा नोंदी घेण्यास निष्काळजीपणा केल्याने अनेकांना फटका बसला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पीक विमा उतरवून घेण्यासाठी सर्वच ६४ शाखांमध्ये मोठी मोहीम राबविली.जिल्हा बँकेच्या वतीने ज्या शाखांमध्ये कर्मचारी कमी आहेत.त्याठिकाणी जास्तीची कर्मचारी पाठवून बँकेत आलेला एकही शेतकरी परत जाणार नाही, याची काळजी घेतली. कपाशी पिकासाठी तब्बल २ लाख ५० हजार ते ७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सर्वच पिकांसाठी विमा उतरविण्याची संधी शासनाने दिली होती. नियोजित वेळेत विमा उतरविण्यात अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांही एक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. जवळपास पिकांना विमा कवच देण्यात आले. महसूल विभागाच्या तलाठ्यांनी यंदाच्यावर्षी केवळ ऊस, कांदा व कापूस या पिकांनाच विमा असल्याचे सांगून शेतकऱ्यांना नोंदी न घेता परत पाठविल्याच्या घटनाही आहेत. जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणात गांभिर्याने विचार करून कारवाई केल्यास पुन्हा एकदा वंचित शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, असे वंचित शेतकरी गोपीचंद जटावाले यांनी सांगितले. आतापर्यंत ऊस आणि कांदा पिकाला विम्याचा लाभ देण्यात आला नाही. जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक एस. आर. पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कपाशीसाठी पीक विमा उतरविला आहे. नोंदणीची संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत १६ कोटी ६१ लाख रूपयांचा विमा उतरविला आहे.सर्वच शाखांमध्ये विमा नोंदविण्याचे काम सुरू होते. एकाही शेतकऱ्याला पीक विमा उतरवितांना त्रास झाला नाही. ही समाधानाची बाब आहे.शासन व विमा कंपनीकडे वेळेत प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. त्यामुळे विमा उतरविल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल. यंदाच्या वर्षी पावसाने दगाफटका दिल्याने शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)