परभणी: १५ ते २० जुलैदरम्यान पडलेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती़ परंतु, नंतर पंधरा दिवस उलटूनही जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने तब्बल ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवरील पिके पाण्याविना सुकू लागली आहेत़ ही पिके जगविण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करताना दिसून येत आहेत़राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ परंतु, वरूणराजाने मराठवाड्याकडे पाठ फिरविली. पावसाळ्यातील महत्त्वाचे जून व जुलै हे दोन महिने परभणी जिल्ह्यात पावसाविना कोरडेठाक गेले आहेत़ ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात कपाशीची लागवड केली होती, त्यापैकी काही हेक्टरवरील कपाशी पाण्याविना जळून गेली़ त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ जुलै महिन्यात पडलेल्या अल्पश: पावसावर कापूस १ लाख ६५ हजार ९८२, सोयाबीन १ लाख ९७ हजार ९४४, तूर ६७ हजार २१९ असे एकूण ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती़ त्यातही नामांकित कंपनीचे पेरलेले सोयाबीन बियाणे उगविलेच नाही़ यामुळे काही शेतकऱ्यांनी दुबार व तिबार पेरणी केली़ यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली़ अशा प्रतिकूल परिस्थितीही शेतकऱ्यांनी हार मानली नाही़ परंतु, वरूणराजाची जिल्ह्यावर वक्रदृष्टी झाल्याने पेरणी केल्यानंतर १५ ते २० दिवस उलटूनही पावसाने हजेरीच लावली नाही़ यामुळे कडक ऊन व पाण्याविना लाखो हेक्टरवरील कापूस, तूर, सोयाबीन ही पिके आता माना टाकू लागली आहेत़ ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात आता ठिंबक, तुषारद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे़ आठ ते दहा दिवस ही पिके पावसाविना कशीबशी तग धरून राहू शकतात़ परंतु, त्यानंतर पाऊस न पडल्यास खरीप हंगाम पूर्ण हातचा जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणापुढे पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ (प्रतिनिधी)चाऱ्याचा प्रश्न गंभीरजिल्ह्यात वाहवनी पाऊसच झाला नाही़ तसेच शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला चारा आता संपत चालला आहे़ त्यातच जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात नेला जात आहे़ याकडे प्रशासनाचे सरार्सपणे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे भविष्यात चाराटंचाईची समस्या प्रशासनासमोर उभी राहणार आहे़ त्यामुळे आतापासून चाराटंचाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ मात्र प्रशासनाचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याने इतर जिल्ह्यात चारा नेला जात आहे. विमा काढण्यासाठी गर्दीजिल्ह्यात जून-जुलै ही दोन महिने कोरडेठाक गेले आहेत़ त्यामुळे दृष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत़ पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती़ त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेमध्ये विमा भरण्यासाठी रागा लावल्या होत्या़ परंतु, खरिपाची पेरणी उशिरा झाल्याने शासनाने ३१ जुलैऐवजी १६ आॅगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची तारीख वाढविल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.पेरले पण उगवलेच नाही अल्पश: पावसावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची लागवड केली़ परंतु, जमिनीत ओलावा नसल्याने हजारो हेक्टरमध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे़ तसेच वर्षाचे आर्थिंक नियोजन बिघडत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे़ धरणांची पाणीपातळी घटलीगतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने अनेक धरणांत मुबलक पाणीसाठा होता़ परंतु, यंदा आॅगस्ट महिन्यांपर्यत पावसाने दमदार हजेरी लावली नाही़ यामुळे जिल्ह्यात मोठ्या धरणात अल्पसा पाणीसाठा राहिला आहे़ तसेच छोटे व पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत़ सव्वा लाख हेक्टरवर पेरणीच झाली नाहीखरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३१ हजार ८१० हेक्टर ऐवढे आहे़ पावसाने हुलकावणी दिल्यामुळे केवळ ३ लाख ९७ हजार ९४४ हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे़ तब्बल सव्वा लाख हेक्टरवर पेरणीच झाली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली़
पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा
By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST