शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले

By admin | Updated: May 12, 2014 00:09 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड एका पाठोपाठ एक संकटाच्या मालिका शेतकर्‍यांच्या पाठीमागे लागल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे.

 व्यंकटेश वैष्णव , बीड एका पाठोपाठ एक संकटाच्या मालिका शेतकर्‍यांच्या पाठीमागे लागल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. बीड जिल्ह्यात तीन वर्षापासूनचा दुष्काळ अन् नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे अर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. यातच गतवर्षीच्या तुलनेत खत, बियाणांचे भाव वाढल्याने शेतकर्‍यांचे खिसे रिते होणार आहेत. बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांची हिरवी शेती पाचोळ्यागत सुकून गेली आहे. जिल्ह्यात सरासरी आठ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. यासाठी सुमारे ७९ हजार ५७४ क्विटल बियाणांची गरज भासणार आहे. अजून पाऊसाळ्याला अथवा पेरणीसाठी एक महिन्याचा अवधी आहे. मात्र ऐन वेळी बियाणे खरेदीचा गोंधळ उडतो. कधी बियाणे अचानक महागते तर कधी मिळतच नाही. या परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा आताच बियाणे खरेदी केलेले बरे. या उद्देशाने शेतकरी बियाणे खरेदीच्या कामाला लागले असून कृषी केंद्रावर शेतकर्‍यांची गर्दी पहावयास मिळते. यंदा बियाणांमध्ये काही वाणाचा तुटवडा भाण्याची शक्यता आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे बियाणे काळे पडल्याने यावर्षी सोयाबिनचा तुटवडा भासत असल्याचे बोलले जात आहे. समस्या पाठ सोडेनात जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून अल्प पाऊस होत असल्याने शेतकर्‍यांकडे मुबलक पाणी नाही. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची पंचाईत झालेली आहे. या संकटात शेतकरी असतानाच मार्च दरम्यान जिल्ह्यात गारपीट झाली. यात शेतकर्‍यांच्या तोंडचा घास अस्मानी संकटाने हिरावून नेला. या दोन संकटामुळे शेतकर्‍यांची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे. यातच आता खत, बियाणे अव्वाच्या सव्वा महागले असल्याने शेतकर्‍यांवर सावकाराकडून कर्ज काढून पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. अशा तिहेरी संकटात बीड जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. खतांचा वापर आवश्यकतेनुसार करावा यंदा हवामान खात्याने कमी पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काटकसरीने रासायनिक खंताचा वापर करावा. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खतांची मात्रा द्यावी, असे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. त्याच शेतकर्‍यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढवावे. कृषी विभाग सज्ज मे महिन्यात शेतकर्‍यांची खत, बियाणांची खरेदी करण्याची लगबग सुरू असते. प्रत्येक शेतकर्‍याला बियाणे व खत वेळेवर मिळाले पाहिजे यासाठी कृषी विभाग सज्ज झालेला आहे. खरेदीच्या वेळी शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये याची काळजी कृषी विभाग घेत असून जिल्हयात एकूण १२ भरारी पथकांची स्थापना केलेली असल्याचे कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात खरिपाचे ८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्र ०८लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्र बीड जिल्ह्यात खरीप पेरणी योग्य आहे. अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. ०६लाख हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी खरिपाची पेरणी झाली होती. यंदा मात्र पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता. ०१लाख ३५ हजार हेक्टरवर गतवर्षी झाली होती सोयाबिनची पेरणी. यंदा क्षेत्र वाढण्याची शक्यता. सोयाबीन क्षेत्र वाढतेय गतवर्षी पासून शेतकरी सोयाबीन शेतीकडे वळत असल्याचे पहावयास मिळते. गेल्यावर्षी बीड जिल्ह्यात १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनचा पेरा होता. यंदा मात्र दीड लाख हेक्टर होण्याची शक्यता आहे. असे आहेत बियाणांचे भाव बियाणेजुने दरनविन दर(प्रति क्विंटल) कापूस९३०९५० तूर९,२००१०,००० सोयाबीन५,८००७,९५० असे आहेत खताचे भाव खतेजुने दरनविन दर (प्रति पाकिट) युरिया२८०२८४ १५:१५:१५७७८८४० एसएसपी३९५३९५ २०:२०:२०७६९९४५ डीएपी१,१८११,२६० १०:२६:२६१,०९५१,०९७