शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

खरीप गेले आता हाती आलेली तूरही जाण्याची शेतकऱ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST

घाटनांद्रा : यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होत. खरीप हंगाम हातचा गेला. मात्र त्याचे पडसाद रबी हंगामावरही ...

घाटनांद्रा : यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होत. खरीप हंगाम हातचा गेला. मात्र त्याचे पडसाद रबी हंगामावरही उमटताना दिसत आहेत. घाटनांद्रा परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी-अधिक होऊ लागले आहे. शनिवारी तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यात सकाळी पावसाच्या सरीदेखील पडल्या. त्यामुळे गहू, हरभरा ही रबी पिके धोक्यात आली असून, हाती आलेली तूरदेखील जाणार, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

घाटनांद्रा परिसरात यावर्षी मुबलक पाण्यामुळे रबीचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. या हंगामात शेतकरी गहू, तूर, हरभरा, वाल, उडीद या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, भेंडी, टोमॅटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक, करडी ही भाजीपाला पिके घेतात. खरीप हंगामात झालेले आर्थिक नुकसान रबी हंगामात बहुतेकदा भरून काढले जाते.

यावर्षी पावसाची उत्तम सुरुवात झाली. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने कपाशी व मका पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे कपाशीच्या एक- दोन वेचणीतच काही शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवून त्या जागी भाजीपाला, गहू, हरभरा आदींची लागवड केली आहे. गहू, हरभरा हे पीक बहरात आले आहे. मात्र, पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने व ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील फळपिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे.

------

तूर काळवंडली

ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळ्या पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. तूर काळी पडली तर मालाच्या प्रतवारीवर परिणाम होतो. परिणामी, बाजारात दरही घसरतो. लागवडीपासून फवारणी ते बाजारात पोहचेपर्यंत तुरीच्या पिकावर बराच खर्च करावा लागतो. काळसर तुरीला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही पडणार नाही. हे निश्चित.

------

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

वातावरणात सतत बदल होत असल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा, तूर या पिकांच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट झाली आहे.

-कचरू मोरे, शेतकरी

वातावरणात बदल होत असून, त्याचा परिणाम मनुष्याबरोबरच पिकांवरही होताना दिसत आहे. पिकांना अनुकूल वातावरण मिळत नसल्याने रोपांची वाढ खुंटली आहे. असेच वातावरण राहिल्यास हातात आलेली पिके जातील.

-अमोल चौधरी, शेतकरी