शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:26 IST

परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली नसल्याच्या २३८ शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत तक्रारी केल्या. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी व पशूसंवर्धन सभापती श्रीनिवास मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरीप हंगामाच्या प्रारंभी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ज्वारी आदींचे काही कंपन्यांचे बियाणे खरेदी केले होते. त्यातील काही मोजक्या कंपन्याकडून फसवणूक झाली व पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प.कृषी सभापती यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी गुरुवारी विविध कंपन्यांचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, गुणनियंत्रण अधिकारी आदींची बैठक बोलावली होती. या बैठकीस प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख यांचीही उपस्थिती होती. जि.प.च्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सोनपेठ तालुक्यातील १७१, पाथरी तालुक्यातील ६२ व परभणी तालुक्यातील ५ अशा एकूण २३८ शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मल्लिका २०७ कापूस बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली. या अनुषंगाने कृषी अधिकारी स्मिता कुपटेकर यांनी या तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले. सोनपेठ तालुक्यातील १७१ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामध्ये नरवाडी येथील शेतकऱ्यांनी कापूस बियाणे २०७ व तृणनाशक फवारणीचे औषध या अनुषंगाने तक्रारी केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप अप्राप्त असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनीही मल्लिका २०७ बियाणे व तृणनाशक फवारणी औषधी संदर्भात तक्रार केली. तालुक्यातील तीन तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. परंतु, कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. परभणी तालुक्यातील ५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीत सोयाबीन उगवले नसल्याचे व तृणनाशक औषधी याची नोंद आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कंपन्यांनी फसवणूक केल्याचेही सांगितले. या संदर्भातील तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्या असून अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्याचे निरसन झाले नाही, असे सांगण्यात आले. मानवत तालुक्यातून एक तक्रार प्राप्त झाली असून याबाबतचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे कृषी अधिकारी एस.टी.तमशेटे यांनी सांगितले. जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू या तालुक्यातून एकही तक्रार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माणिक कदम यांनी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर सर्वच कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक चालू ठेवावेत व ते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन सभापती मुंडे यांनी केले. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. यावेळी कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे अभिनंदन केले.