शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

शेतकऱ्याची नजर ऊस शेतीच्या पलिकडे

By admin | Updated: December 19, 2015 23:44 IST

उस्मानाबाद : पावसाअभावी जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाची ही तीव्रता वाढविण्यात मागील काही वर्षांत जिल्ह्यात फोफावलेल्या ऊस उत्पादनाचा वाटाही मोठा आहे.

उस्मानाबाद : पावसाअभावी जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाची ही तीव्रता वाढविण्यात मागील काही वर्षांत जिल्ह्यात फोफावलेल्या ऊस उत्पादनाचा वाटाही मोठा आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या वतीने पीक पध्दती बदलण्यासाठी ऊस शेतीच्या पलिकडे हे अभियान राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंब तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल तीन एकरावर ड्रीपच्या माध्यमातून तुरीचे उत्पादन घेतले असून, तुरीची वाढ पाहता हा प्रयोग सर्वार्थाने यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळेच बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. शहरांसह वाड्या-वस्त्यांसमोरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असून, पिकांची अवस्था दयनीय आहे. भूगर्भातील पाणीपातळीतही अनेक ठिकाणी सुमारे पंधरा मिटर एवढी विक्रमी घट झालेली आहे. मात्र, त्यानंतरही नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी उसाच्या मागे लागल्याचे चित्र दिसून येत होते. इतर पिकांच्या तुलनेत उसाला जास्तीचे पाणी लागते. दुष्काळी जिल्ह्यात अशा पध्दतीने पाण्याचा होत असलेला उपसा पाहता भविष्यात येथील पूर्ण शेती व्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने ‘ऊस शेतीच्या पलिकडे’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील अनेक शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. कळंब तालुक्यातील आंदोरा येथील दिलीप तांबारे या प्रगतशील शेतकऱ्यानेही या उपक्रमाच्या माध्यमातून पीक पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. तांबारे यांच्याकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात ऊस तसेच टरबूज होता. यंदा मात्र त्यांनी उसाचे क्षेत्र कमी केले. याबरोबरच टरबूजही बाजुला करून तेथे तुरीची लागवड केली. टरबुजासाठी त्यांनी ड्रीप घेतलेले होते. याच ड्रीपच्या साह्याने त्यांनी तुरीचे तीन एकर क्षेत्र फुलविले आहे. सद्यस्थितीत ही तूर सहा ते साडेसहा फुटापर्यंत वाढली असून, अत्यल्प पाण्यावर तुरीची भरघोस वाढ झाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला आहे. पूर्वी उसाला पंधरा दिवसाआड पाणी द्यावे लागत होते. मात्र, महिन्यातून एकदा पाणी देवूनही तुरीचे क्षेत्र हिरवेगार आहे. विशेष म्हणजे, तुरीसाठी केवळ फवारणीचा खर्च झालेला असल्याने अत्यंत कमी खर्चात त्यांना जास्तीचे उत्पादन मिळणार आहे. तीन एकर क्षेत्रात अंदाजे ४५ ते ५० क्विंटल तूर निघेल, असा अंदाज असून, तुरीचा सध्याचा भाव पाहता उसापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन अपेक्षित असल्याचे तांबारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अशा रितीने पीक पध्दती बदलल्यास शेतकऱ्यांना फायदा तर होणारच आहे. याबरोबरच लाख मोलाचे पाणीही वाचणार आहे.