भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद जवळील रामनगर येथील शेतकरी अनंदा तोताराम कांबळे या शेतकऱ्याकडे रामनगर गट नं.२८ मध्ये पाच एकर जमीन आहे. या शेतकरीला विशेष घटक योजनेमध्ये २०८ मध्ये विहिर मंजूर झाली होती. या शेतकरीने विहीर खोदकाम केलेले आहे. परंतू विहिरीत पाणीसाठा असूनही वीजजोडणी नसल्याने अडचण होत आहे.या लाभधारकाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी २००९ मध्ये वीज जोडण्यासंबंधी पत्र देण्यात आले. मात्र, या लाभधारकास २०११ ते १२ मध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत विद्युत पुरवठा मिळावा म्हणून पत्र देवूनही शेतकऱ्यास वीजपुरवठा मिळाला नाही. त्यानंतर २०११ मध्ये ग्रुप सॅन्क्शनमध्ये १० शेतकऱ्यांच्या यादीत ४६२० रू. अनामत भरूनही या शेतकऱ्याचे नाव वगळण्यात आले. याविषयी अनंदा तोताराम कांबळे सर्व संबंधित अधिकारी मिळून मला जाणूनबुजून त्रास देत आहेत. अभियंता कोलते म्हणाले, आठ शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा आमदारांनी सांगितल्याने जोडण्यात आला, कांबळे यांचे काम लवकरच करणार आहे. ठेकेदार घाडगे म्हणाले की वीज जोडणीसाठी साहित्य अपूर्ण होते. त्यामुळे वीजजोडणी करण्याचे राहून गेले येत्या आठ दिवसांत शेतकऱ्याच्या शेतात वीज जोडणी करण्यात येणार आहे.
शेतकऱ्याला मिळेना वीजजोडणी..!
By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST