शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
6
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
7
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
8
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
9
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
10
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
11
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
13
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
14
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
15
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
16
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
17
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
18
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
19
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
20
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला

‘सर्वोपचार’वर अतिरिक्त ताण !

By admin | Updated: July 6, 2014 23:58 IST

लातूर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडला आहे़

लातूर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडला आहे़ उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज २०० च्या जवळपास वाढ झाली आहे़ परिणामी, काही प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयाचे नियमितचे नियोजनही कोलमडत असल्याचे दिसून येत आहे़गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे़ यात जिल्ह्यातील ९२ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत़ त्याचबरोबर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत असलेले ६० कंत्राटी डॉक्टरही शुक्रवारपासून या आंदोलनात सहभागी झाले आहेत़या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग्णांची तपासणी बंद झाली आहे़ त्याचबरोबर दोन उपजिल्हा रुग्णालयातील आणि दहा ग्रामीण रुग्णालयातील ४८ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले असल्याने तेथील तपासणीबरोबरच उपचारही थांबला आहे़ गेल्या आठवड्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया, सुरक्षित बाळंतपण, शवविच्छेदन झाले नाही़रुग्णांना सुविधाच मिळत नसल्याने आर्थिक स्थिती चांगली असलेले नातेवाईक आपल्या रुग्णांस खाजगी दवाखान्यात घेऊन जात आहेत़ ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नाही ते मात्र शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा आधार घेत आहेत़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज दाखल होतात़ त्यामुळे येथे रुग्णांचा मेळाच भरलेला पाहावयास मिळतो़ दररोज ९०० च्या जवळपास नोंदणी होते़ परंतु, गेल्या मंगळवारपासून या नोंदणीत जवळपास २०० ने वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे़ ‘सर्वोपचार’मध्ये १ जुलै रोजी १ हजार २२९, २ रोजी १ हजार १११, ३ रोजी १ हजार १२४, ४ जुलै रोजी १ हजार १७१ तर ५ जुलै रोजी १ हजार २१ अशी रुग्णांची नोंदणी होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत़ रुग्णांची संख्या वाढली असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वॉर्ड रुग्णांनी हौसफुल्ल झाले आहेत़ या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या इमारतीत बसण्यासाठी जागा नसल्याने रुग्णालय परिसरात थांबत असल्याचे दिसून येत आहे़ अत्यावश्यक सेवा, जननी शिशुसुरक्षा कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात रुग्णवाहिका आहेत़ आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने या शासकीय रुग्णवाहिकांचा उपयोग रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी होत आहे़ त्यामुळे अनेकदा या रुग्णवाहिकेवरील चालकच ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांना सल्ला देत असल्याचे ऐकावयास मिळत आहे़ काही रुग्णवाहिकाचालकांना सुरुवातीस डॉक्टरांचा संप असल्याची माहिती नसल्याने ते थेट नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी घेऊन जात होते. डॉक्टर नसल्याचे समजताच पुन्हा तेथून खाजगी रुग्णालयाची वाट धरत होते. या धावपळीमुळे अतिरिक्त वेळ खर्च होत असल्याने नातेवाईकांची धास्ती वाढल्याचे दिसून येत होते. सध्या मात्र बिनधास्तपणे हे रुग्णवाहिका चालक खाजगी रुग्णालयांचा रस्ता दाखवीत आहेत. (प्रतिनिधी)अत्यावश्यक सेवा रुग्णांत वाढ़़़दररोजच्या ओपीडीबरोबरच अत्यावश्यक सेवेच्या रुग्णांत वाढ झाली आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात सेवा मिळत नसल्याने रुग्णांचा त्रास वाढत असल्याने त्यांना कोणत्याही वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे़ गरोदर मातांमध्ये लक्षणीय वाढ...सुरक्षित बाळंतपण व्हावे, अशी अपेक्षा असली तरी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने गरोदर माता व त्यांचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडे धाव घेत आहेत़ त्यामुळे या संपाच्या कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयात नैसर्गिक बाळंतपण, सिझरचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे या बाळंत महिलांसाठी खाटांचा तुडवडा होत आहे़ ३० खाटांच्या वॉर्डात ७४ बाळंत महिलांना सेवा दिली जात आहे़ त्याचा ताण परिचारिकांवरही पडत आहे़ रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने काही प्रमाणात सेवाही विस्कळीत होत आहे़ रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या असून सेवा देण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ़ दीप्ती डोणगावकर यांनी सांगितले़