शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

विस्तार अधिकारी चतुर्भुज

By admin | Updated: June 10, 2014 00:58 IST

गंगापूर : येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांना सरपंचाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

गंगापूर : येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांना सरपंचाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. रांजणगाव नरहरी पिंप्री गु्रप ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसलेल्या मालमत्ता अतिक्रमण ठरवून पाडण्यात याव्यात, अशी मागणी गावातील काही मंडळींनी पंचायत समितीकडे केली होती. विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठविला होता. यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच नारायण सूर्यभान बाराहते यांना ३९/१ प्रमाणे आपले सरपंचपद रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली होती. यावर विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांनी सरपंच बाराहते यांच्याकडे कारवाई थांबवण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र बाराहते यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून विस्तार अधिकारी एल.जी. गव्हाणे यांच्या विरोधात तक्रार दिली. ठरल्याप्रमाणे ९ तारखेला दुपारी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर.टी. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारी १ वाजेदरम्यान सरपंच नारायण बाराहते पंचायत समिती कार्यालयात आले, त्यावेळी विस्तार अधिकारी जागेवर होते. बाराहते यांना पाहताच त्यांनी स्थापत्य विभागाच्या संगणक कक्षाकडे येण्याचा इशारा केला व पैशांची मागणी केली. बाराहते यांनी पाच हजार रुपये दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गव्हाणे यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयात पंचनामा करण्यात येऊन विस्तार अधिकारी गव्हाणे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक स.दे. बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक भा.ब. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आर.टी. चोपडे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सुधाकर मोहिते, कैलास कामठे, विक्रम देशमुख, श्रीराम नांदुरे, अजय आवले, बाळासाहेब महाजन, संदीप चिंचोले आदींनी केली.