शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विकासकामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: November 2, 2015 00:17 IST

लातूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष झाले आहे़ या कालावधीत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत़ या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी,

लातूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष झाले आहे़ या कालावधीत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत़ या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, अशा सूचना सर्वाजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे केली़ भाजपाच्या वतीने भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब कांबळे होते़ मंचावर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, मोहन माने, गुरुनाथ मगे, देवीदास काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारने वर्षभराच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख योजना आणल्या आहेत. त्यातच जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक प्रकल्प, तलाव आणि नद्यामध्ये जलसाठा वाढला आहे. कांही गावांचा भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्नही सुटला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्या योजनांची अंमबलबजावणीही सुरु आहे. या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवावी, असेही देशमुख यांनी आवाहन केले. कार्यक्रमास गीता गौड, स्वाती जाधव, सुवर्णा यलाले, सुरेखा पाटील, डॉ़राणी पुंड, सुबोध बेळंबे, अनिल शिंदे, लक्ष्मण शिंदे, अमोल पाटील, वसंत मदने आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. (प्रतिनिधी)