शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम शहराध्यक्षांची तडकाफडकी हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:14 IST

बीड : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शेख मोईन यांनीच ‘डिलींग’चा मार्ग दाखवून पाठिंब्याचे ‘रेट’ ठरविले होते... असा गौप्यस्फोट करणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

बीड : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शेख मोईन यांनीच ‘डिलींग’चा मार्ग दाखवून पाठिंब्याचे ‘रेट’ ठरविले होते... असा गौप्यस्फोट करणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष मोईन यांनी त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली.येथील पालिकेत एमआयएमचे ९ नगरसेवक पहिल्याच प्रयत्नात निवडून आले आहेत. मात्र, पाठिंबा देण्यावरुन दुफळी निर्माण झाली आहे. सात सदस्यांनी वेगळा गट स्थापन करुन पक्षाला उघड आव्हान दिले. यासंदर्भात रविवारी आ. इम्तियाज जलील यांनी बीडमध्ये येऊन फुटीर नगरसेवकांना गद्दारी केल्यास गय नाही, अशा शब्दांत फटकारले होते. यावेळी त्यांनी शहराध्यक्ष डॉ. हाश्मी यांच्या कार्यालयास भेट देऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. डॉ. हाश्मी यांनी प्रदेशाध्यक्षांनीच दोन्ही क्षीरसागरांकडून पाठिंब्यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करण्यास सांगितले, असा खळबळजनक आरोप केला होता. शिवाय आमच्यावर विकले गेल्याचा आरोप केला जातो; मात्र ज्यांनी हा सल्ला दिला, त्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष का हटवीत नाही, असा सवालही उपस्थित केला होता. त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आमदारासमोरच शहराध्यक्षांनी पक्षाचे वाभाडे काढल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची पक्षाने गंभीर दखल घेत शहराध्यक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षविरोधी वक्तव्य करुन समाजात पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत डॉ. हाश्मी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होता. (प्रतिनिधी)