शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भंगार वेचणाºया मुलांनी केलेली घरफोडी १८ तासात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:30 IST

जागृत हनुमाननगर परिसरात घरफोडी करून सोने, चांदी, मोबाईल असा ३९,३०० रूपयांचा मुद्देमाल चोरणाºया चोरट्यांना भाग्यनगर पोलिसांनी १८ तासात अटक केली़ सदर चोरी भंगार, कचरा वेचणाºया विधी संघर्ष बालकांनी केल्याचे उघड झाले असून दोन महिलांना अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जागृत हनुमाननगर परिसरात घरफोडी करून सोने, चांदी, मोबाईल असा ३९,३०० रूपयांचा मुद्देमाल चोरणाºया चोरट्यांना भाग्यनगर पोलिसांनी १८ तासात अटक केली़ सदर चोरी भंगार, कचरा वेचणाºया विधी संघर्ष बालकांनी केल्याचे उघड झाले असून दोन महिलांना अटक केली आहे़भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागृत हनुमाननगर येथे राहणारे अविनाश योगाजी सक्करवाड यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ यामध्ये त्यांनी घरातील एक तोळे सोने, पाच तोळे चांदीचे दागिणे, ६८०० रूपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३९ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला़ ही घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली़ यानंतर अविनाश सक्करवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला़ दरम्यान, भाग्यनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी पोउपनि उमाकांत उगले, सविता खर्जूले, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, बालाजी सातपुते, विलास कदम, रितेश कुलथे, सुमेध पुंडगे यांनी तपासास गती दिली़ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून भंगार, कचरा वेचणाºया दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेवून चौकशी केली़ यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सदर चोरी केलेले सोने, मोबाईल हे सुरेखा शाहु नक्कलवाड (वय २०) व संगम नक्कलवाड (वय २४) यांच्याकडे दिल्याचे सांगितले़ त्यानंतर सदर महिलांचा पोउपनि चंद्रकांत पवार, सविता खर्जूले, पोकॉ वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, फैयाज पठाण यांनी शोध घेवून त्यांना अटक केली़ दरम्यान, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला असून सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली केली़ सदर गुन्ह्याचा तपास चमकुरे हे करीत आहेत़