शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

१७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित

By admin | Updated: August 7, 2014 02:08 IST

जाधववाडीतील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने व्हिजन- २०१८ हा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे

प्रशांत तेलवाडकर औरंगाबादजाधववाडीतील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने व्हिजन- २०१८ हा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. याद्वारे सिमेंटचे रस्ते, गोदाम, फूल बाजार, शीतगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीपासून ते पेट्रोल पंपापर्यंतच्या ३५ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी १७ कोटी ५० लाखांचा खर्च बाजार समिती आपल्या उत्पन्नातून करणार आहे. यातील काही प्रकल्प विविध शासकीय योजनांतून करण्यात येणार आहेत. भविष्यातील खाजगी बाजार समित्यांशी स्पर्धा करण्यासाठी आणि बाजार समित्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने राज्य पणन मंडळाने राज्यातील २९९ बाजार समित्यांना व्यवसाय विकास आराखडा तयार करण्यास सांगितले होते. याअंतर्गत जाधववाडीतील बाजार समितीने २०१८ पर्यंतचा विकास आराखडा तयार केला. उल्लेखनीय म्हणजे, आजपर्यंत बाजार समित्यांना व्हिजनच नव्हते. मात्र, या विकास आराखड्याने बाजार समित्यांना नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. येत्या चार वर्षांत आपणास कोणत्या कामावर लक्ष केंद्रित करायचे, हे आता निश्चित झाले आहे.मागील वर्षीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतबाजार समितीने पाच वर्षांचा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. त्यातील २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात ४ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम उभारणे, ६ हजार मे. टन क्षमतेचे मका संकलन केंद्र उभारणे, बीओटी तत्त्वावर फुलांचे स्वतंत्र मार्केट उभारणे, सेल हॉल क्र.२ च्या आजूबाजूस रस्त्याचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण करणे या प्रस्तावांना अजूनही पणन मंडळाची मंजुरी मिळाली नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाची ग्रेडिंग व्यवस्था करण्यासाठी चाळणी यंत्र उभारणे, संरक्षण भिंतीचे काम करण्यास मंजुरी मिळाली.व्यवसाय विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे१ २०१४- २०१५ मध्ये मुख्य रस्ता डांबरीकरण, काँक्रिटीकरण करणे, फळे व भाजीपाला या मालासाठी सुसज्ज कोल्ड स्टोरेजची उभारणी करणे, किराणा मार्केटला प्लॉट देऊन विकसित करणे आदी कामांचा समावेश आहे.२ २०१५- २०१६ मध्ये फळे, भाजीपाला मार्केट व जनरल शॉपिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे, पे अ‍ॅण्ड यूज तत्त्वावर स्वच्छतागृहाची उभारणी करणे, बाजार समितीचे संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण करणे, शेतकऱ्यांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे.३ २०१६- २०१७- शेतकऱ्यांसाठी सुधारित शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे, व्यापारी व शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी पेट्रोल पंप उभारणे, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग युनिट उभारणे, भुसार मालाचे हार्वेस्टर खरेदी करणे.४ २०१७- २०१८- वाहनतळाची उभारणी करणे, बँकेची शाखा उघडणे, घनकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना नाममात्र किमतीत भोजनाची व्यवस्था करून देणे, ५० मे. टनचा काटा बसविणे, पिसादेवी रोडवर शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम करणे, शीतवाहन खरेदी तसेच अत्याधुनिक टॉली बेल्ट आदींची खरेदी करणे हे प्रमुख प्रस्ताव आहेत. प्रस्ताव पाठविणे सुरू लवकरच मंजुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन.ए. अधाने यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षातील ६ विकासकामांचे प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविण्याचे काम सुरूआहे. या व्हिजन- २०१८ मुळे बाजार समितीला नवीन दृष्टी मिळाली आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नियोजनबद्ध आखणी करण्यात आल्याने त्याचा फायदा शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना होणार आहे. यातूनच बाजार समितीचे उत्पन्नही वाढणार आहे.कृउबाचे प्रशासक अनिलकुमार दाबशेडे म्हणाले, कृउबाने पहिल्यांदाच व्हिजन- २०१८ हा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. यात एकूण ३५ प्रस्ताव आहेत. त्यातील चालू आर्थिक वर्षातील ४ प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येत आहेत. तसेच मागील वर्षातील काही प्रस्ताव आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हे प्रस्ताव मंजूर व्हावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. चार वर्षांत उत्पन्न १२ कोटींवर पोहोचणार!बाजार समितीने तयार केलेल्या आराखड्यात २०१७-२०१८ या वर्षापर्यंत बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १२ कोटी १० लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात ७ कोटी ५६ लाख वार्षिक उत्पन्न दाखविण्यात आले आहे. दरवर्षी बाजार समिती ३ कोटी ४८ लाख रुपये विकासकामांवर खर्च करणार आहे.