रमेश दुरुगकर, औसाऔसा नगरपालिकेने १५ वर्षापूर्वी पोलिस स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या गावतळ्याच्या जागेत २० ते ३० लाख रुपये खर्चून मोठे उद्यान उभारले. या उद्यानामध्ये मुलांसाठी खेळणी देखील बसविली. चोहोबाजूंनी संरक्षण भिंत उभारली़ मात्र हे उद्यान अल्पायुष्यच ठरले़ चार-पाच वर्षातच याची दुरवस्था झाली़ पाणी व देखभाल-दुरुस्ती न केल्यामुळे या उद्यानाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे़ सध्या हे संपूर्ण उद्यान उजाड झाले असून, मोकाट जनावरांचा वावर या ठिकाणी दिसून येत आहे़ औसा शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या मोठ्या तलावानजीक आणखी एक उद्यानाची निर्मिती नगरपालिकेने याच काळात केली होती़ तात्कालीन नगराध्यक्ष अॅड़ मुजीबोद्दीन पटेल यांच्या पुढाकारातून दोन्ही उद्यानांची निर्मिती झाली होती़ या उद्यानांमुळे औसा शहराच्या सौंदर्यात भरही पडली. परंतु पाणी नसल्यामुळे आणि देखभाल न केल्यामुळे या उद्यानातील हिरवळ वाळली़ तसेच खेळण्यांची दुरावस्था झाली़ त्यामुळे लाखो रुपये खर्च वाया गेला आहे़ दोन्ही उद्यानांची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़
औश्याच्या उद्यानाचे अस्तित्व नष्ट
By admin | Updated: April 12, 2015 00:52 IST