शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ३६ पथकांची स्थापना

By admin | Updated: September 13, 2014 00:11 IST

परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाली असून, प्रशासनाने ३६ आचारसंहितेवर वॉच ठेवण्यासाठी ३६ पथके स्थापन केली आहेत.आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रशासनाच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, प्रशासन सज्ज झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच जिल्ह्यात ३६ पथके कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून, प्रत्येक मतदार संघात तीन या प्रमाणे १२ भरारी पथके कार्यरत झाले आहेत. त्याचप्रमाणे आचारसंहितेची प्रत्येकी ३ अशी बारा आणि १२ संनियंत्रण पथके कार्यरत करण्यात आली आहेत. एक उपविभागीय अधिकारी, एक पोलिस अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी आणि एक व्हिडीओग्राफर या पथकामध्ये राहणार आहे. त्याचप्रमाणे चौदा नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिली आहे. निवडणूक काळात पैश्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, या निवडणुकीत देखील प्रत्येक नाक्यावर तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदारांना व्होटर स्लिप देण्याचे प्रयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.